डॉ. आंबेडकरांच्या ‘मूकनायक’चा १०१ वा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:06+5:302021-02-05T05:02:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून तळागाळातील वंचित समाजाच्या वेदनांना प्रगट ...

Dr. Celebrating the 101st anniversary of Ambedkar's 'Mooknayak' | डॉ. आंबेडकरांच्या ‘मूकनायक’चा १०१ वा वर्धापन दिन साजरा

डॉ. आंबेडकरांच्या ‘मूकनायक’चा १०१ वा वर्धापन दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून तळागाळातील वंचित समाजाच्या वेदनांना प्रगट करण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले. या ‘मूकनायक’ वर्तमानपत्राची सुरुवात ३१ जानेवारी १९२० रोजी झाली होती. त्या घटनेच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त रंगावलीतून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

इतिहासप्रेमी मंडळातर्फे सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अ‍ँड मेमोरिअलमधील अभ्यासिकेच्या प्रांगणात ८ बाय ६ आकारातील डॉ. आंबेडकर व मूकनायक वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाची रंगावली रेखाटण्यात आली. यावेळी सिंबायोसिस संस्थेचे पद्मभूषण प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, सी. आर. पाटील, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. सुप्रसिद्ध रंगावलीकार प्रा. अक्षय शहापूरकर यांनी १२ तासांच्या कालावधीत ही रंगावली रेखाटली. ही रंगावली दोन दिवस पाहण्याकरिता खुली आहे.

Web Title: Dr. Celebrating the 101st anniversary of Ambedkar's 'Mooknayak'