शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला दुहेरी मुकुट

By admin | Updated: March 12, 2015 23:54 IST

राज्यस्तरीय कबड्डी : महिलांचे सलग चौथे तर पुरुषांचे पहिले विजेतेपद

पुरळ : पुण्याने १७ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात विजय संपादन करून दुहेरी मुकुट मिळविला. पुण्याच्या महिलांचे हे सलग चौथे जेतेपद तर पुरुषांना प्रथमच यश लाभले. महिलांच्या सामन्यात मुंबई उपनगरची कोमल देवकर तर पुरुषांच्या सामन्यात रत्नागिरीचा कुलभूषण कुळकर्णी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्यांना ठाण्याचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी जाहीर केलेले रोख ५ हजार रुपये प्रत्येकी देऊन गौरविण्यात आले.जामसंडे-देवगड येथील विद्याविकास शाळेच्या पटांगणावर बुधवारी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा २६-९ असा पराभव करीत रोख रुपये १ लाख २५ हजार व छत्रपती शिवाजी चषक पटकावला. उपविजेत्या उपनगरला चषक व ७५ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. सामन्यात पहिला गुण घेत मुंबई उपनगरने सुरुवात झोकात केली. पण, पुण्याने खचून न जाता मध्यंतराला ९-४ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर तिसऱ्या मिनिटाला लोन देत पुण्याने १६-७ अशी आघाडी घेतली. उपनगर संघाला पूर्णवेळेत आघाडीवर येता आले नाही. पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने रत्नागिरीचे आव्हान १७-७ असे संपुष्टात आणत रोख रुपये १ लाख २५ हजार व चषक पटकावला. रत्नागिरीला रोख रुपये ७५ हजार व चषकावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या मिनिटाला गुण घेत पुण्याने गुणांचे खोलले. मध्यंतराला ४-१ अशी पुण्याकडे आघाडी होती. नंतर मात्र भक्कम पकडी व चढाईच्या जोरावर ८ गुणांनी विजय साकारला. रत्नागिरीच्या सतीश खांबेने एकाच चढाईत तीन गडी टिपत सामन्यात सनसनाटी निर्माण केली. परंतु दोन वेळा त्याची पकड झाल्यामुळे सामना त्यांच्या हातून निसटला. रत्नागिरीकडून कुलभूषण कुळकर्णी, सतीश खांबे यांनी कडवी लढत दिली. (वार्ताहर)