शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
4
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
5
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
6
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
7
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
8
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
9
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
10
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
11
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
12
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
13
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
14
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
15
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
17
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
18
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
19
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
20
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक दरवाढीचा दुहेरी फटका: पिशव्यांच्या किमती ४०% वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

By अजित घस्ते | Updated: March 21, 2026 10:16 IST

प्लास्टिक वस्तूंच्या किमतीत वाढ, पिशव्यांचे दर वाढले ४० टक्क्यांनी; सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका तर प्लास्टिकचा चटका

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवरही जाणवत आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे प्लास्टिक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. विशेषतः प्लास्टिक पिशव्यांच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्यांच्या किमतीही वाढल्याचे होलसेल प्लास्टिक खेळण्याचे व्यापारी सुरेश जैन यांनी सांगितले.

दरवाढीमुळे किराणा दुकानदार, भाजी विक्रेते आणि इतर लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. काही विक्रेत्यांनी पर्याय म्हणून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. मात्र, त्यांचेही दर तुलनेने जास्त असल्याने पूर्णतः पर्याय उपलब्ध होणे कठीण जात आहे.

जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवण्याची ही योग्य वेळ असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुळशी पर्यावरण समन्वयक बाळासाहेब रास्ते यांनी प्लास्टिकचा वापर कमी करून पुनर्वापरक वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

असे आहेत सध्याचे दर

प्रकार                                                 दर प्रतिकिलो

प्लास्टिक पिशवी ५० मॉक्रो : वरची - १२५ रुपयांवरून २२५ रुपये किलो

प्लास्टिक खेेळणी : बॉल - ब’ट- - ५० रुपयांवरून ते ८० ते ९०

प्लास्टिक खुर्ची लहान - २५० रुपयांवरून ते ३५०

प्लास्टिक खुर्ची मोठी -  ५५० रूपयांवरून ते ७५० ते ९००

प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या : १० रुपयांवरून १५ तर २० वरून २५

घरगुती प्लास्टिक बादल्या व भांडी : १०० रुपयांवरून १५० तसेच १८० वरून २२०

सणात प्लास्टिक वस्तू महागल्या

आगामी चैत्र यात्रांच्या काळात बाजारात लागणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने घरगुती वापराच्या वस्तू, खेळणी, पाण्याच्या बाटल्या आणि सजावटीच्या साहित्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

अशी आहेत दरवाढीची प्रमुख कारणे : युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. मार्च २०२६ मध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०० च्या पार गेल्याने प्लास्टिकचा कच्चा माल किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याने प्लास्टिकच्या तयार वस्तू महागल्या आहेत.

- महाराष्ट्र सरकारने सण-उत्सव आणि समारंभात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर पूर्णपणे बंदी घालण्याने पर्यायी प्लास्टिक साहित्याचा तुटवडा जाणवत आहे.

- डेकोरेटर्ससाठी खर्चाचे गणित बदलले आहे. नियम मोडल्यास पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केल्याने अनेक विक्रेत्यांनी प्लास्टिक साहित्याचा साठा कमी केला आहे.

- विक्रेते आणि ग्राहकांवर परिणाम

पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड व मंडई, बोअर आळी, पेठा, कोंढवा परिसरातील विक्रेत्यांनी कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे. यात्रांच्या काळात प्लास्टिकच्या गृहोपयोगी वस्तूंची मोठी उलाढाल होते. मात्र यंदा वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. दुसरीकडे, प्लास्टिक फुलांवर बंदी आल्याने नैसर्गिक फुलांच्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागील काही आठवड्यांत प्लास्टिक पिशव्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी ज्या पिशव्या ठराविक दराने मिळत होत्या, त्या आता ३० ते ४० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. किरकोळ विक्रेत्यांनाही हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकावा लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. - सुरेश जैन, माजी अध्यक्ष, मंडई व्यापारी संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Plastic price hike hits consumers: Bag prices up 40 percent.

Web Summary : Plastic bag prices surge 40% due to raw material shortages and transport costs. Toy and furniture prices also climb, impacting small businesses and consumers. Alternatives are costly. Experts urge eco-friendly options amid rising plastic prices.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे