शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 14:11 IST

अनेक ठिकाणी होतोय सर्वेक्षणाला एनआरसी-सीएएच्या नावाखाली विरोध

ठळक मुद्दे पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय अशा संवेदनशील भागात सर्वेक्षणाला जाऊ नये

पुणे : महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरु वात केली असून कुटुंबातील कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का याची माहिती घेतली जात आहे. परंतू, काही ठराविल मोहल्ल्यांमध्ये मात्र या सर्वेक्षणाला विरोध होत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय अशा शहरातील कोणत्याही भागात सर्वेक्षणाला जाऊ नये अशा मौखिक सूचना वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.पालिकेने घरोघरी सर्वेक्षणाकरिता पथके तयार केली आहेत. साधारणपणे दीड हजार कर्मचारी या कामाकरिता नेमण्यात आले आहेत. या पथकांमधील कर्मचाऱ्यांना विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या घेण्याचे तसेच त्यांच्या घरातील व्यक्तींच्या आजारांची माहिती घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. परंतू, काही ठराविक भागात या कर्मचा-यांना मज्जाव केला जात आहे. महिला कर्मचाऱ्यांसोबतही वादाचे प्रसंग घडले आहेत.  हे कर्मचारी एनआरसी आणि सीएएचे सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले आहेत.त्यामुळे कर्मचारी दहशतीखाली काम करीत आहेत. या कर्मचा-यांसोबत पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय अशा संवेदनशील भागात सर्वेक्षणाला जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांनी या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात काही ठिकाणी मात्र प्रशासनाच्या कामाला असहकार केला जात असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस