शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फडके यांच्या पाठशाळेला गोधन दान

By admin | Updated: June 30, 2015 22:58 IST

पुणे येथील व्यापारी श्रीराम परतानी यांनी आपली लाडकी कन्या व जावयाला गोधन आंदण म्हणून दिले. परंतु, याच परंपरेत वाढलेल्या या लाडक्या कन्येने हे गोधन अधिक

आळंदी : पुणे येथील व्यापारी श्रीराम परतानी यांनी आपली लाडकी कन्या व जावयाला गोधन आंदण म्हणून दिले. परंतु, याच परंपरेत वाढलेल्या या लाडक्या कन्येने हे गोधन अधिक मासातील दानाचे महत्त्व विचारात घेऊन आळंदी येथील वसंत फडके यांच्या नृसिंह सरस्वती पाठशाळेला दान करून पुण्य मिळवले.श्रीराम परतानी व ज्येष्ठ उद्योजक गणेश सारडा यांनी आळंदी येथे आयोजित केलेल्या संकीर्तन महोत्सवाच्या पाचव्या दिवशी विविध कार्यक्रम झाले. गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद पुराणात सर्वत्र गोमातेचे महत्त्व विशद करण्यात आलेले आहे. गोमातेचे शेण, गोमूत्र व तिचे खाद्य यातून जैविक अन्नाची निर्मिती करणे शक्य असून, त्याचे कोणतेच दुष्परिणाम जाणवत नसल्याची माहिती पुणे येथील प्रसिद्ध औषधविक्रेते जयेश कासट यांनी दिली, तर श्रीराम भागवत कथेतील दृष्टांत श्रीराम परतानी यांनी दिले. श्रीराम परतानी यांचे परमगुरू दिनकर महाराज आंचवले यांच्या हस्ते सोमवारी म्हणजेच एकादशी दिवशी गोधनदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी स्वामी गोविंदगिरीजी महाराज, हभप चैतन्यमहाराज देगलूरकर, वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज, हभप दिनकरमहाराज आंचवले, कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम परतानी, गणेश सारडा व जयप्रकाश सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सद्गुरू संकीर्तन महोत्सव आळंदी येथे दि. २६ जूनपासून आळंदी येथे सुरू असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. भाविकांसाठी मोफत भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे गणेश सारडा यांनी सांगितले. (वार्ताहर)