शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर-पालिका वादात वाढतेय साथ

By admin | Updated: September 13, 2016 01:45 IST

शहरात ऐन गणेशोत्सवादरम्यान वाढलेली डेंगी आणि चिकुनगुनियाची साथ दिवसेंदिवस वाढत चालली असून, पालिकेकडे मात्र रुग्णांची योग्य ती नोंद नसल्याचे चित्र आहे.

पुणे : शहरात ऐन गणेशोत्सवादरम्यान वाढलेली डेंगी आणि चिकुनगुनियाची साथ दिवसेंदिवस वाढत चालली असून, पालिकेकडे मात्र रुग्णांची योग्य ती नोंद नसल्याचे चित्र आहे. महापालिका आणि डॉक्टर यांच्यातील वादाचा फटका रुग्णांना बसत असल्याचे दिसत आहे. खासगी डॉक्टर, रुग्णालये आणि पॅथलॅबने पालिकेकडे आकडेवारी कळवावी, असे पालिकेकडून वारंवार सांगण्यात येत होते. याला खासगी यंत्रणा प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही पालिकेकडून वारंवार करण्यात येतो. मात्र, पुण्यातील काही खासगी पॅथलॅबचालकांना याबाबत विचारल्यावर आपल्याकडे पालिकेची व्यक्ती आकडेवारी घेण्यासाठी येते असे सांगण्यात आले. मात्र तरीही पालिकेची आकडेवारी कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. मग या रुग्णांची नोंद नेमकी होते की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. याबरोबरच अनेक खासगी डॉक्टरही पालिकेकडे आपली आकडेवारी पाठवत आहेत. मात्र त्याची नोंद घेतली जात नसल्याची तक्रार काही डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे. डेंगीच्या रुग्णांची संपूर्ण माहिती कळविल्यास कदाचित साथ जाहीर करावी लागेल, म्हणून महापालिका खरी आकडेवारी जाहीर करीत नसल्याचा आरोपही काही डॉक्टरांकडून केला जात आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांतून सध्या असणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची माहिती मागविण्यात येत आहे. पालिका अनेक स्तरांवर याबाबत जनजागृतीही करत आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जात असून, रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. - डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिकासध्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच ही साथ रोखण्यास पालिकेची यंत्रणा अपुरी असल्याचे दिसते. यामध्ये सध्या कोणत्याही आजाराचे निदान न झालेलेही अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे ही संख्या आणखीही जास्त असण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयांकडून ही आकडेवारी पालिकेला कळविली जात आहे. मात्र, जोपर्यंत रुग्ण दगावत नाहीत तोपर्यंत साथ आल्याचे जाहीर केले जात नाही. त्यामुळे डेंगीचा रुग्ण दगावण्याची पालिका वाट पाहते की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. - डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियनमंगळवार पेठ, येरवड्यात सर्वाधिक रुग्ण शहरात डेंगी व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असून, मंगळवार पेठ व येरवडा परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंगी व चिकुनगुनियाच्या चाचण्या करण्यासाठी खासगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या ६०० रूपयांमध्ये करण्याचे त्यांच्यावर बंधन टाकण्यात यावे, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.खाजगी रूग्णालयांमध्ये डेंगी व चिकुनगुनियाच्या चाचण्या करण्यासाठी दीड हजार ते चार हजार रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या चाचण्या ६०० रूपयांमध्ये करण्याची सक्ती रूग्णालयांना करण्यात यावी, अशी मागणी महापौरांनी राज्य शासनाकडे केली आहे. प्रशांत जगताप यांनी महापालिकेच्या दवाखान्यांना भेटी देऊन डेंगी व चिकुनगुनियाच्या रुग्णांची माहिती घेतली. या वेळी महापालिकचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी, डॉ. संजीव वावरे, डॉ. फ्रान्सिस उपस्थित होते.