शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनादिवशीचे वाहतूक नियोजन

By admin | Updated: September 26, 2015 02:41 IST

लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांनी बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी सेवासदन चौक

पुणे : लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांनी बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी सेवासदन चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक मार्गे दर्शन घेऊन बेलबाग चौकाकडे जायचे असल्यास पासोड्या विठोबा, सोन्या मारुती चौक, केंजळे चौकाकडून बेलबाग चौकाकडे जावे.सातारा रस्त्याकडून येणारी वाहने शंकरशेठ रस्ता, गोळीबार मैदान चौक, भैरोबानाला चौक, सर्किट हाऊसमार्गे नगर रस्त्याने जातील तसेच नगर रस्त्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने उलट दिशेने जातील. साताऱ्याकडून मुंबईकडे व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने एक्स्प्रेस-वे नेच जातील.एकेरी मार्ग : (सकाळी ९ ते मिरवणूक संपेपर्यंत)१. शिवाजी रस्ता / लक्ष्मी रस्ता : गाडगीळ पुतळा चौक ते जिजामाता चौक, गणेश रस्त्याने फडके चौक, मोती चौक सरळ सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, सेवासदन चौक, सरळ लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (टिळक चौक बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी)२. नकलाकार भोंडे पथ : अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक - मोती चौकाकडे जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (मोती चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे येण्यास बंदी)३. रामेश्वर चौक ते शनिपार चौक : रामेश्वर चौकाकडून शनिपार चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. टिळक, बाजीराव, कुमठेकर आणि केळकर रस्ता हे मार्ग पादचाऱ्यांसाठी दुहेरी केले आहेत.मिरवणुकीच्या वेळी बंद करण्यात येणारे रस्ते : शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक. लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी ७ ते मिरवणूक संपेपर्यंत. बगाडे रस्ता : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक - सकाळी ९ ते मिरवणूक संपेपर्यंत. बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत. कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत. गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत. भोंडे / केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत. टिळक रस्ता : जेधे चौक ते अलका टॉकीज चौक. शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक - दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत. जंगलीमहाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)फर्ग्युसन रस्ता : फर्ग्युसन कॉलेज गेट ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)भांडारकर रस्ता : पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार).