शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

डीपीवरून पालिकेत असंतोष

By admin | Updated: March 24, 2015 00:24 IST

जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेत नियोजन समितीने केलेल्या शिफारशींवर सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार टीका करण्यात आली.

पुणे : जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेत नियोजन समितीने केलेल्या शिफारशींवर सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. बिल्डरधार्जिण्या अहवालामध्ये सर्वसामान्यांच्या घरांवर मात्र वरवंटा फिरविण्यात आल्याचे स्पष्ट करून निवासी झोनवर टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. डीपीमध्ये बदल झाला तर ठीक अन्यथा आमचा मार्ग मोकळा असल्याचाही इशारा सोमवारी मुख्य सभेत देण्यात आला.मुख्य सभेत डीपीवरच्या चर्चेची सुरुवात काही मोजक्या सदस्यांच्या भाषणाने झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘वानवडीतील निवासी जागेवर पीएसपी (सार्वजनिक इमारतींचे) आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याचा १२०० ते १५०० कुटुंबीयांना फटका बसणार आहे. मंजूर इमारतीच्या जागेवरून २४ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. याविरुद्ध वानवडीमधील एक हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या. मात्र कोणतेही कारण न देता या हरकती फेटाळून नियोजन समितीने आरक्षण कायम ठेवले आहे. त्यामध्ये डीपीमध्ये आम्ही कुठेच नाही. आमची कोणतीही चौकशी करा, आमच्या घरांवर वरवंटा फिरताना तुम्ही काहीच कसे बोलला नाहीत, याचे उत्तर उद्या मला मतदारांना द्यावे लागणार आहे. नातेवाइकांच्या घरांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे.’’ नियोजन समितीच्या सदस्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कारच केला पाहिजे, अशी उपहासात्मक शेरेबाजी करीत नियोजन समितीने केलेल्या पापाचा वाटेकरी मी कदापि होणार नाही, असे जगताप यांनी ठामपणे सांगितले. वानवडीकरांच्या वेदना मांडण्यासाठी आपल्याला इतकं कठोर बोलावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन समितीच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढणारे प्रशांत जगताप यांचे भाषण ऐकताना सभागृह अवाक झाले. भाषणानंतर त्यांचे विरोधी पक्षांतील सदस्यांनी अभिनंदन केले.शांतता... नगरसेवकांचा अभ्यास ‘चालू’ आहेनियोजन समितीने डीपीच्या शिफारशींचा अहवाल २० फेब्रुवारी रोजी मुख्य सभेपुढे ठेवला. त्यानंतर लगेच सर्व नगरसेवकांना त्याच्या प्रती, सीडी पाठवून देण्यात आल्या. नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून त्यांचे मराठीमध्ये सादरीकरणही करण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांनी डीपीवर बोलावे याकरिता सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नगरसेवकांचा अपवाद वगळता डीपीवर बोलण्यासाठी नगरसेवकांनी नावच दिले नाही. नगरसेवक डीपीवर आज का बोलले नाहीत, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.