शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘दूधगंगा’चे संचालक मंडळ बरखास्त

By admin | Updated: August 30, 2016 01:56 IST

दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे अधिकारी एम. व्ही. जाधव यांची प्रशासक

इंदापूर : दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे अधिकारी एम. व्ही. जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १८ सप्टेंबरनंतर ते दूधसंघाचा ताबा घेऊ शकतात. दूधगंगा दूध उत्पादक सहकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. के. पाटील यांनी दूधगंगाच्या कर्मचारी सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जाधव यांच्या नियुक्तीमुळे दूधगंगा दूध संघ पु्न्हा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना बसलेला मोठा धक्काच असल्याचे मानले जात आहे.पाटील म्हणाले, की पुणे जिल्हा संघाचे कर्मचारी, त्यांना देण्यात येणारा पगार, सेवाशर्तींसह तालुका संघ बाजूला काढून राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सन १९९८मध्ये दूधगंगा संघाची स्थापना केली होती. प्रारंभीच्या काळात दूधगंगाचे कामकाज चांगले चालले होते. कालांतराने दूधसंकलनात घट आली, कर्ज वाढले, कामगारांचे पगार होईनासे झाले. संचालक व कामगारांमधील दरी वाढू लागली.दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे कामगार संघटनेने वेळोवेळी शासनाकडे कामगारांच्या थकीत वेतनाबाबत व दूध संकलन बंद असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहेत. सन २०१०-११ ते २०१५ अखेर एकूण ७ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होता. प्रतिदिन दूध संकलन २५०० ते ३००० लिटरवर आले होते. मात्र, संघाने आपले दुग्धव्यवसायाच्या मूळ उदिष्टावर लक्ष केंद्रित न करता त्याचे रक्षणन करता दूध संघाच्या शासकीय जागेवर शॉपिंग सेंटर बांधकाम कामकाज हाती घेतले. संचालक मंडळाने दि. २६/३/२०१३ रोजी सहा नागरी पतसंस्थांकडून ४ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. या कर्जाचे व्याज ७ कोटी ८ लाख थकीत आहे. सन २०१३-१४ मध्ये मंजूर शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्राप्त अनुदान आत्तापर्यंत संघास ४ कोटी ६२ लाख रुपये रकमेचा खर्च निरुपयोगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.