जिल्हा रुग्णालयात होणार अपंग पुनर्वसन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:48+5:302021-02-05T05:11:48+5:30

पुणे : दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र कार्य करत असते. या केंद्रासाठी औंध रुग्णालयात जागा मिळावी ...

Disability Rehabilitation Center to be set up at District Hospital | जिल्हा रुग्णालयात होणार अपंग पुनर्वसन केंद्र

जिल्हा रुग्णालयात होणार अपंग पुनर्वसन केंद्र

पुणे : दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र कार्य करत असते. या केंद्रासाठी औंध रुग्णालयात जागा मिळावी तसेच हे केंद्र या ठिकाणी उभरण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र हे बहुउद्देशीय केंद्र आहे. या केंद्रामार्फत जिल्ह्यात विविध शिबिरे आयोजित करून दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळवून देणे, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रासाठी सहकार्य करणे, मोफत सल्ला तसेच मार्गदर्शन, विविध शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांची उपलब्ध करून देणे यासाठी नोडक संस्था म्हणून हे केंद्र कार्यरत आहे. मात्र, या केंद्राला हक्काची इमारात नव्हती. यामुळे हे केंद्र उभारण्यासाठी औंध येथील जिल्हा रुग्नालयाच्या आवारात या केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार होता. त्याला गुरूवारी मंजुरी मिळाली.

औंध रूग्णालयाच्या आवारात ४०० चौरस मीटर परिसराची जागा यासाठी देण्यात आले आहे. या जागेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मंजुर करून या पुनर्वसन केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे.

चौकट

एकाच ठिकाणी मिळणार सर्व माहिती

दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच अनेक योजनांची माहिती घेण्यासाठी विविध ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. यामुळे त्यांची गैरसोय होत होती. या नव्या केंद्रामुळे एकाच ठिकाणी सर्व सुविधा दिव्यांगांना मिळणार आहे. यामुळे त्यांची सोय होणार आहे.

Web Title: Disability Rehabilitation Center to be set up at District Hospital