शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीची माहिती सरकारला मिळाली नव्हती का? : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:05 IST

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोरील साक्षीनंतर साधला पत्रकारांशी संवाद

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीची प्राथमिक माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती किंवा ती मिळाली नसल्यास का मिळाली नाही याचा शोध कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने घ्यावा, अशी साक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यांच्याकडील अन्य महत्त्वाची कागदपत्रेही मागवावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.कोरेगाव भीमा आयोगाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आंबेडकर यांची बुधवारी (दि. १८) पुन्हा साक्ष झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साक्षीमध्ये त्यांनी आयोगाला पूर्वी दिलेल्या पत्राचा उल्लेख केला. दंगलीची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मलिक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांना मिळाली होती. मात्र, ती माहिती मिळाली नसल्यास का मिळाली नाही याचा शोध घेण्याचे काम आयोगाचे आहे. त्यांनी ते करावे, असे आंबेडकर यांनी सांगितले. अशी दंगल पुन्हा घडू नये, यासाठी सरकारने सूचना मागितल्या आहेत. तसेच घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारचे धोरण कसे चुकले, याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पवार यांच्याकडे आणखी महत्त्वाची कागदपत्रे असल्यास आयोगाने ती मागून घ्यावीत, असा युक्तिवादही आयोगापुढे केला.अमित शाहांवर टीकाराज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध होता. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. त्यामुळे मंगळवारी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेले वक्तव्य हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण आहे. वक्तव्यातून ती पुन्हा बाहेर आली आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्यावेळी त्यांचे असलेले नियोजन अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्याची अंमलबजावणीही करता येत नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे, अशी खरमरीत टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसCourtन्यायालयAmit Shahअमित शाह