शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:05 PM

शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली.

ठळक मुद्देअपघातानंतर जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल

आळेफाटा : ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात ढोल ताशा पथकाचा एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.संजय रखमाजी त्रिभुवन (वय ५०)  असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपुर (अहमदनगर) येथील पूनम ढोल पार्टीचे पथक मुंबई येथील गणेश उत्सव कार्यक्रमात वाजवून टेम्पोतून (क्रमांक एमएच १४, डीएम. २८२९) कल्याण नगर महामार्गाने परतत असताना आळेफाट्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडगाव आनंद परिसरात समोरून येणाऱ्या दुधाचा टॅकर (एमएच १४ बीजे ६८९६ ) यांची समोरासमोर धडक झाली.दरम्यान, ढोल ताशा पथकातील शाहरूख रशिद शेख (वय २३), ख्वाजा रशिद शेख (वय २५), विशाल दिलीप थोरात (वय २२), सागर कचरू शेलार (वय २४), राजू संजय साबळे (वय १९), संजू पुजा भालेराव (वय ३१), किरण हनुमंत ननावरे (वय २८), उमेश चव्हाण (वय ३०), अजय धिवर (वय २६), सचिन बोरकर (वय २०), नरेंद्र चव्हाण (वय २७), विष्णू शेलार (वय ३०) (सर्व रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले. यातील गंभीर जखमी शेख बंधु व किरण ननावरे यांना पुढील उपचारासाठी संगमनेर व नगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थ व आळेफाटा पोलिसांनी जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.   

टॅग्स :Junnarजुन्नरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू