Join us  

मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Hardik Pandya IPL MI Team Latest Update:

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:02 AM

Open in App

मुंबई इंडियन्सनेआयपीएल २०२४ मधून गाशा गुंडाळला आहे. शेवटचा सामना देखील हरले. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यापासून मुंबईच्या टीम वादात सापडली होती. एमआयच्या चाहत्यांनी पांड्याला तर धारेवरच धरले होते. पहिल्या सामन्यापासून जो वाद सुरु झाला तो शेवटच्या सामन्यापर्यंत चालूच होता. रोहित शर्माने समजावूनही शमला नाही. अशातच हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवरच फोडल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपजरजायंटने मुंबई इंडियन्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर १८ धावांनी धुळ चारली. लखनऊने २० षटकांत 214/6 रन्स बनविले होते. प्रत्युत्तरादाखल एमआयने २० ओव्हरमध्ये 196/6 रन्स बनवू शकली. 

यानंतर हार्दिक पांड्याने मॅचमध्ये झालेली चूक सांगण्याऐवजी टीमकडून पूर्ण सीझनमध्ये झालेली चूक सांगितली. पूर्ण सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने क्वालिटी क्रिकेट खेळले नाही. याचा परिणाम सर्वांसमोर आहे, असे पांड्या म्हणाला. तसेच पुढील सीझनमध्ये पांड्याने जोरदार पुनरागमन करू असे सांगितले.

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. मुंबई इंडियन्सच्या आयपीएल इतिहासात त्यांच्या संघाला एका हंगामात 10 पराभवांना सामोरे जावे लागण्याची ही दुसरी वेळ आहे. 2022 मध्येही मुंबईने दहा सामने गमावले होते. यंदाच्या मोसमात मुंबईने गुणतालिकेत तळाचे स्थान पटकावले आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्याआयपीएल २०२४