‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली

By Admin | Updated: September 22, 2014 05:36 IST2014-09-22T05:36:04+5:302014-09-22T05:36:04+5:30

सोमेश्वर कारखान्यातील कागदपत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोणीही अधिकारी अथवा पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही.

Deputy Chief Minister confesses that Someshwar's mistake is late | ‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली

‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्यातील कागदपत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोणीही अधिकारी अथवा पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही. कारखान्याचा कारभार करत असताना चूक झाली आहे. ती उशिरा लक्षात आल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शेतकरी व युवक मेळाव्यात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते.
या वेळी शिवाजीराव
भोसले, बी. जी. काकडे, विजय कोलते, दत्ता चव्हाण, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, संभाजी होळकर, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, रामचंद्र भगत, राजेंद्र कोरेकर,
दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, अशोक टेकडे, बाळासाहेब तावरे आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, की सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सभेचा प्रकार माझ्या कानांवर आला होता. सभासदांना उसाचा भाव देताना संचालक मंडळाने २00९-१0 मध्ये २६२७ बसत असताना तो २६४८ रूपये दिला. २०१०-११ मध्ये १९०४ रुपये बसत असताना तो २३२० रुपये दिला. या ठिकाणी ४१६ रूपये अधिक भाव दिला. २०११-१२ मध्ये २०८८ रूपये बसत असताना २४५० रूपये
दिला. २०१२-१३ मध्ये २३००
रूपये बसत असताना तो २७०० रूपये दिला. या चार वर्षांत सभासदांना १०२ कोटी रूपये जादा दिले.
तसेच या वर्षात वाहतूक खर्चही कमी गृहीत धरण्यात आला. तसेच प्रतापगड कारखान्याचा मोठा फटका बसला आहे. ही चूक झाली आहे.
मात्र, ती उशिरा लक्षात आली.
नवीन हंगामात गाळप चांगले झाल्यास कर्जफेडीसाठी चांगली मदत होऊ शकते. सोमेश्वरचे लेखापरीक्षण करणाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे अशी चूक परत होणार नाही. सोमेश्वर सेवा संघाचा ‘आॅडिट मेमो’ आला. यामध्ये ३ कोटी २२ लाख कमी पडतात. यामधील दोषींना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. मी जे बोलतो ते करतोच, असे सांगितले.
कार्यक्रमात पुरुषोत्तम जगताप, सतीश सकुंडे, शैलेश रासकार, विक्रम भोसले, संभाजी होळकर यांनी
मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन सतीश सकुंडे, शैलेश रासकर, नितीन भोसले, फत्तेसिंह चव्हाण, विक्रम काकडे यांनी केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते यांनी केले, तर आभार विक्रम काकडे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Deputy Chief Minister confesses that Someshwar's mistake is late