मागणी वाढली! पाणीटंचाईने फेब्रुवारीत ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या; पुण्याच्या उपनगरातील अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:15 IST2026-03-17T17:14:49+5:302026-03-17T17:15:08+5:30

शहराच्या धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस, पाषाण या भागातून टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे

Demand increased! 46 thousand 068 tanker trips in February due to water shortage; Situation in Pune suburbs | मागणी वाढली! पाणीटंचाईने फेब्रुवारीत ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या; पुण्याच्या उपनगरातील अवस्था

मागणी वाढली! पाणीटंचाईने फेब्रुवारीत ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या; पुण्याच्या उपनगरातील अवस्था

पुणे : उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी २०२४-२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ३९ हजार ४८८ टँकर सुरू होते. तर २०२३-२४ वर्षात फेब्रवारी महिन्यात ३३ हजार ९५१ टँकर सुरू होते.

टँकर भरण्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रुंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग या सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. या ठिकाणांहून महापालिकेच्या मालकीचे तसेच ठेकेदारांचे टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करतात. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने आतापासूनच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात ४२ हजार ५४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढून ४६ हजार ६८ टँकरवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये ३९ हजार ४८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

डिसेंबरपासूनच शहरातील विविध भागात टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत टँकरची मागणी वाढत असून, पुढील काही महिन्यांमध्ये उन्हाची वाढत असलेली तीव्रता लक्षात घेता टँकरची संख्या वाढणार असल्याचे निश्चित आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहराचा उपनगरांचा भाग असलेल्या धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस, पाषाण या भागातून टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागात महापालिकेला पाणीपुरवठा करण्यास जमत नाही. जेथे कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. किंवा जलवाहिन्यांचे जाळे विकसित झालेले नाही, त्या भागांत महापालिका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करते. हे पाणी मोफत दिले जाते. तसेच शहराच्या विविध भागांतील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका ठराविक शुल्क घेऊन पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणी देते. तर खासगी ठेकेदारांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कमी दरात टँकर भरुन देते.

गेल्या काही वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील टँकरची आकडेवारी

फेब्रुवारी २०२३-२४ : ३३ हजार ९५१
फेब्रुवारी २०२४-२५ : ३९ हजार ४८८
फेब्रुवारी २०२५-२६ : ४६ हजार ०६८

Web Title : पुणे में जल संकट: फरवरी में टैंकरों की मांग बढ़ी

Web Summary : गर्मी के आगमन के साथ पुणे में पानी की कमी बढ़ रही है। फरवरी में टैंकरों के 46,068 फेरे हुए, जो पिछले वर्षों से अधिक हैं। उपनगरीय क्षेत्रों में मांग बढ़ी है, जहाँ नगरपालिका अपर्याप्त आपूर्ति वाले क्षेत्रों को मुफ्त पानी प्रदान करती है। आने वाले महीनों में टैंकरों की मांग और बढ़ने की उम्मीद है।

Web Title : Pune Faces Water Scarcity: Tanker Demand Soars in February

Web Summary : Pune grapples with rising water scarcity as summer approaches. February saw a surge to 46,068 tanker trips, up from previous years. Increased demand is noted in suburban areas, with the municipality providing free water to areas lacking adequate supply. Tanker demand is expected to rise further in coming months.