शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:59 AM

मुकेश पाणीपुरी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता.

पुणे:  पाणीपुरीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कुत्रा चावल्यानंतर योग्य उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केशवनगर मुंढवा येथे घडली. मुकेश बहादुर बैठा (वय 33, रा. बाबा कल्याणी गल्ली, केशव नगर मुंढवा, मूळ रा. चंपारण्य बिहार ) या कामगाराचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

मुकेश हा गेल्या अनेक वर्षांपासून केशव नगर मुंढवा येथील पाणीपुरी कारखान्यात काम करत होता. काही दिवसापूर्वी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता. 19 फेब्रुवारी रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने त्याचा चुलत भाऊ जुगल बैठा याला फोन करून सांगितले. त्यामुळे मुकेश याला वडगाव शेरी येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. त्याला कुत्र्याने चावा घेतला असून  मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे असे त्या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर बुद्रानी हॉस्पिटल येथे नेले असता त्याला नायडू हॉस्पिटल ला दाखल करावे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्याच रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला नायडू हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 23 फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई,पत्नी,दोन लहान मुले असा परिवार आहे. 

मुकेश हा अनेक दिवसांपासून या पाणीपुरी कारखान्यात काम करत होता. त्याला कुत्रा चावल्यानंतर त्याला तातडीने योग्य उपचार मिळाले नाहीत. तसेच कुत्रा चावल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली नाही. त्याला योग्य उपचार मिळाले असते अथवा त्याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी कामगार आयुक्त पुणे विभाग तसेच सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

पुणे शहरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावर असे कारखाने चालवण्यात येतात. या ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडतात. संबंधित कारखान्यांचे मालक अथवा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींकडून नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा  एखाद्या गोरगरीब मजूर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो. मात्र त्याकडे कामगार विभाग तसेच इतर प्रशासकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राDeathमृत्यूPoliceपोलिसEmployeeकर्मचारी