शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बॉम्बस्फोटातील फरारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: April 5, 2015 01:47 IST

मध्य प्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पळालेले व फरासखाना बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघांचा आंध्र प्रदेशात पोलीस चकमकीत खात्मा झाला.

पुणे : मध्य प्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पळालेले व फरासखाना बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघांचा आंध्र प्रदेशात पोलीस चकमकीत खात्मा झाला. त्यात ‘मास्टरमाइंड’ मोहम्मद एजाजुद्दीनचा समावेश आहे.संबंधित दहशतवादी हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते, अशी यंत्रणांची माहिती आहे. १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी हे पाच दहशतवादी मुख्य संशयीत आहेत.आंध्र प्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मोहम्मद एजाजुद्दीन उर्फ एजाज उर्फ रियाज उर्फ राहुल (३२) आणि मोहम्मद अस्लम अयुब खान (२८) यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तत्पूर्वी हैदराबादमध्ये गुरुवारी नाकाबंदीमध्ये संशयीत वाहनांची तपासणी करताना अस्लम आणि एजाजुद्दीनने पोलिसांची कार्बाईन हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला. त्यामध्ये होमगार्ड महेश शहीद झाले तर पोलीस निरीक्षक वाय. मोगलीह जखमी झाले होते. शनिवारी सकाळी नलगोंडामधील जानकीपुरम भागात अस्लम आणि एजाज यांनी गोळीबार केला. त्यात पोलीस शिपाई नागराजे शहीद झाले. पोलिसांनी प्रत्त्युतरादाखल केलेल्या गोळीबारात अस्लम आणि एजाजुद्दीन ठार झाले.