शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 10, 2015 04:18 IST

केसनंद परिसरातील चारवडा पाटीलवस्ती येथे भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

वाघोली : केसनंद परिसरातील चारवडा पाटीलवस्ती येथे भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ९० वर्षीय वृद्धेस गजाने मारहाण करून चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हल्लेखोरांनी घरातील वस्तूंची उलथापालथ केली असल्याने चोरीच्या उद्देशातून त्यांच्यावर हल्ला झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.सोनाबाई बाबूराव गिरीगोसावी (वय ९०) असे मृत महिलेचे नाव आहे. राधा दिलीप ढवळे (वय २५) अशी गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. केसनंद येथील चारवाडा पाटीलवस्ती परिसरामध्ये सोनाबाई गिरीगोसावी या एकट्याच घरामध्ये राहतात. त्यांच्या शेजारी दिलीप ढवळे यांचे सहा जणांचे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राधा ढवळे वगळता इतर सर्व सदस्य घराच्या बाहेर गेले होते. १०.३० वाजता राधा ढवळे यांचे आजेसासरे बाबासाहेब ढवळे घरी परतले. सीमाभिंतीला कुलूप लावले असल्याने त्यांनी आतमध्ये गेट उघडण्याकरिता आवाज दिला असता, कोणीही प्रतिसाद दिला नाही. सीमाभिंत ओलांडून बाबासाहेब ढवळे आतमध्ये गेले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. स्वयंपाकघरामध्ये पाहिले असता राधा ढवळे यांच्या मानेजवळ चाकू भोसकून रक्तबंबाळ झाल्याचे दिसले. लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाची मदत घेण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. लोणीकंद ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. राधा ढवळे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.नागरिकांमध्ये घबराट पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांतर्गत चोरट्यांचा धुमाकूळ असल्याची अफवा पसरविल्या जात होत्या. बुधवारी दिवसाढवळ्या दोन महिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे अफवांना जोड मिळाली असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.