पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:43 IST2025-04-15T16:42:59+5:302025-04-15T16:43:23+5:30

श्री सराफ दुकानात सोन्याची चैन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना ३ ,४ जणांनी दुकानात शिरून दरोडा टाकला

Daylight robbery in Pune's Dhayari area Gold ornaments worth 25 to 30 tolas were stolen from a jeweller's shop | पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

पुणे : पुण्याच्या धायरी भागात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चक्क दुकानात शिरून आरोपींनी धमकी देत २५ ते ३० तोळे दागिने हिसकावले आहेत. त्यानंतर आरोपी  दुचाकीवरून फरार झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील काळुबाई चौक, रायकर मळा येथे श्री सराफ दुकानात दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला . सोन्याची चैन दाखवा असे  सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना अजून दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात शिरले. त्यांनी खेळण्यातले पिस्तूल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करत अंदाजे 25 ते 30 तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने हिसकावले. दरम्यान दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हाताने मारहाण करून, पिस्टलचे बॅटने मारहाण करून दुचाकीवरून फरार झाले.

 

Web Title: Daylight robbery in Pune's Dhayari area Gold ornaments worth 25 to 30 tolas were stolen from a jeweller's shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.