दिवसाआड पाऊस; पाठशिवणीचा खेळ सुरू

By Admin | Updated: June 13, 2015 04:40 IST2015-06-13T04:40:30+5:302015-06-13T04:40:30+5:30

दिवसाआड होणाऱ्या तुरळक पावसाने सध्या पाठशिवणीचा खेळ चालविला आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या पावसाची पतीक्षाच आहे.

Day by day; The game of coaching continues | दिवसाआड पाऊस; पाठशिवणीचा खेळ सुरू

दिवसाआड पाऊस; पाठशिवणीचा खेळ सुरू

पिंपरी : दिवसाआड होणाऱ्या तुरळक पावसाने सध्या पाठशिवणीचा खेळ चालविला आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या पावसाची पतीक्षाच आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २२ अंशांपर्यंत घटले असून, हवेत गारवा पसरला आहे.
पुणे येथील हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आठवडाभरात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर परिसरात व मावळ तालुक्याच्या काही भागांत पाऊस होत आहे. गुरुवारीही दुपारी शहरात सर्वत्र व लगतच्या मावळ, मुळशी या तालुक्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, तो एक दिवसानंतर व कमी प्रमाणात आहे. परिणामी, शहरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळीच संपूर्ण ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जोरदार पाऊस होणार, अशी शक्यता होती. (प्रतिनिधी)

Web Title: Day by day; The game of coaching continues