शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलवरील वाहन चालकांचे लक्ष विचलित करून मारत होते डल्ला; ‘टक-टक’ गँगच्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:43 IST

शहरातील सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांशी संवाद साधून त्यांचे लक्ष विचलित करत आणि त्याच क्षणी कारमधील मोबाइल किंवा इतर वस्तू चोरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पुणे : शहरातील सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी कारचालकांना लक्ष्य करून मोबाइल व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या परराज्यीय ‘टक-टक’ गँगचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील विविध ठिकाणी अशाच प्रकारच्याचोरी केल्याची कबुली दिली आहे. रवी ओमप्रकाश कोहली (३८) आणि अफजल कय्यूम अब्बासी (३८, दोघेही रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार दोघे आरोपी शहरातील एका लॉजमध्ये येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. तपासात आरोपींनी ११ फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरात सिग्नलवर उभ्या असलेल्या कारचालकाला कारला धक्का लागल्याचे भासवून लक्ष विचलित केले आणि खिडकीतून हात घालून महागडा मोबाइल आणि पाकीट चोरल्याची कबुली दिली. याशिवाय विमाननगर चौक परिसरातही अशाच पद्धतीने कारचालकांची फसवणूक करून मोबाइल चोरी केल्याचे समोर आले आहे.

आरोपी शहरातील सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांशी संवाद साधून त्यांचे लक्ष विचलित करत आणि त्याच क्षणी कारमधील मोबाइल किंवा इतर वस्तू चोरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरीक्षक अजित जाधव, पोलिस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, नीलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का आणि प्रफुल शेलार यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Bust 'Tak-Tak' Gang Stealing from Distracted Drivers

Web Summary : Pune police arrested two members of the 'Tak-Tak' gang from Uttar Pradesh. They distracted drivers at signals, stealing phones and valuables. The gang confessed to multiple thefts in Pune using this method.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीThiefचोरcarकारbikeबाईकfraudधोकेबाजी