शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचे थर... अन् सामाजिक मदतीवर भर!

By admin | Updated: September 6, 2015 03:23 IST

दहीहंडीचा उत्सव उत्साहाने साजरा करतानाच बारामती शहरातील दहीहंडी मंडळांनी सामाजिक जबाबदारी महत्त्वाची मानली आहे. त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीदेखील पुढाकार

बारामती : दहीहंडीचा उत्सव उत्साहाने साजरा करतानाच बारामती शहरातील दहीहंडी मंडळांनी सामाजिक जबाबदारी महत्त्वाची मानली आहे. त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीदेखील पुढाकार घेतला आहे. आज दहीहंडीनिमित्त झालेल्या बैठकीत अनेक दहीहंडी मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीसह दुष्काळी गावांतील जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याचे टॅँकर आदींंची मदत करण्याचा निर्धार केला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. या वेळी सर्वच अधिकाऱ्यांनी दहीहंडी मंडळांनी दुष्काळाचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. त्याला बारामती फ्रेन्डस सर्कल दहीहंडी मंडळाचे संयोजक नगरसेवक सुनील सस्ते यांनी बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त अंजनगावासाठी रोख ५१ हजार रुपये जाहीर केले. तर भाजपाचे नितीन भामे यांनी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे सांगितले. खंडोबानगर येथील शिवक्रांती सामाजिक कला, क्रीडा प्रतिष्ठान दुष्काळग्रस्त भागातील गरीब कुटुंबाना धान्यवाटप केले जाणार आहे. तर याच मंडळांच्या वतीने १२ हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने बारामती तालुक्यातील दुष्काळी भागात १५ दिवस पिण्याच्या पाण्याचे वाटप मोफत केले जाणार आहे, असे संयोजक चंद्रकांत लोंढे यांनी सांगितले. यंदा दुष्काळी स्थिती असतानाही बारामतीमध्ये दहीहंडी उत्सवाची संख्या वाढली आहे. मागील वर्षी ३८ मंडळांनी दहीहंडी उभारल्या होत्या. आता त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. दहीहंडी मंडळ उत्सवच जेमतेम ३ ते ४ तासांचा असतो. त्यामुळे या उत्सवात प्रशासनाने फार ताणू नये, असे मंडळाच्या उपस्थित असलेल्या प्रमुखांनी सांगितले. बारामती बॅँकेचे संचालक सचिन सातव, नगरसेवक सुनील सस्ते, नीलेश इंगुले, करण इंगुले, अ‍ॅड. नितीन भामे, संतोष गालिंदे, अभिजित काळे, रूतूराज काळे, सतीश फाळके, पप्पू बल्लाळ, अ‍ॅड. विनोद जावळे, किशोर मासाळ आदींनी चर्चा केली. दहीहंडीला सहासी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे, अशी मागणी अ‍ॅड. भामे, सुनील सस्ते यांनी केली. आवाजावर मर्यादा ठेवादहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार डीजेच्या आवाजावर निर्बंध आले. त्याचे पालन मंडळांनी करावे, उत्सवादरम्यान आवाजाची घनता तपासण्यात येणार आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई होईल, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले. विधायक उपक्रम राबवादहीहंडी उत्सवात मागील दोन वर्षांतील अनुभव चांगले नाही. त्यामुळे सर्वच मंडळांनी काळजी घेण्याची गरज आहे. दुष्काळामुळे सामाजिक शांततादेखील धोक्यात आहे. त्यामुळे विधायक कामावर लक्ष अधिक द्यावे, असे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.