शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST

मनसे नेत्याने पत्र पाठवून केली विनंती बारामती :बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होण्याची भीती व्यक्त ...

मनसे नेत्याने पत्र पाठवून केली विनंती

बारामती :बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बारामती शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची भासणारी कमतरता, रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी केला आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी अ‍ॅड. पाटसकर यांनी केली आहे.

राज्यपालांना याबाबत अ‍ॅड. पाटसकर यांनी पत्र लिहीत साकडे घातले आहे. या पत्रात अ‍ॅड. पाटसकर यांनी स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.येथील स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली नियमबाह्य थेट रुग्णांना इंजेक्शन देत नाही.तर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जात आहेत. ते कार्यकर्ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही इंजेक्शन देत आहेत. प्रशासन एका पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे,असे वाटण्यास वाव असल्याचे पाटसकर यांनी यामध्ये नमूद केले आहे.

बारामती येथील स्थानिक प्रशासन निर्णय घेताना कधीच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही.एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकांना बोलविले जाते. अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने औषध व्यावसायिक मनमानी करीत आहेत.रेमडेसिविरच्या बाबतीत सखोल आॅडिट होण्याची गरज आहे.या वितरणाची जबाबदारी प्रशासनाची आहे,मात्र, ते दबावाखाली काम करीत आहेत. बारामतीचे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,औषध निरीक्षक हे प्रशासकीय अधिकारी भेदभाव करीत आहे.ते त्यांची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नाहीत.त्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी,अशी मागणी पाटसकर यांनी केली आहे.

———————————————

बातमी सविस्तर घेणे