शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोरोनासेवक बनून पोलिसांनी केले खंडणीखोराला जेरबंद; डॉक्टर महिलेकडे मागितली होती ५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 8:50 PM

तुमच्या पतीने तुमची व तुमच्या मुलाच्या हत्येची ५ लाखाला मला सुपारी दिली आहे.

पुणे : सय्यदनगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर काही जण कोरोना सेवक असल्याचे सांगून कामगारांची माहिती घेऊन लागले. एकेका कामगाराला बोलावून त्यांची माहिती टिपून घेतली जात होती. प्रत्येकाचा मोबाईल नंबर घेतला जात होता. त्यानंतर तो समोर आला. त्याने मोबाईल नंबर सांगितल्यावर तो टिपून घेणाऱ्यांनी इशारा केला. दुसऱ्या त्याला तुझ्या अंगात टेम्परेचर दिसते आहे, तु जरा बाजूला उभा रहा म्हणून त्याला एका बाजूला घेऊन पकडले व त्याला पोलिसांनी आपले खरे रुप दाखवून पोलीस ठाण्यात आणले. अतिशय चलाखीने पोलिसांनी वेशांतर करुन खंडणीखोरास पकडले.

राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मुळ छत्तीसगड) असे या खंडणीखोराचे नाव आहे. त्याने एका महिला डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.तुमच्या पतीने तुमची व तुमच्या मुलाच्या हत्येची ५ लाखाला मला सुपारी दिली आहे. मात्र मुलांच्या हत्येची सुपारी मी घेत नाही. मुलाला वाचवायचे असेल तर मला ५ लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत खूनाच्या धमकीने खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला. मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करुन २४ तासाच्या आत तपास करून आरोपीला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांचे बिबवेवाडी कोंढवा परिसरात क्लिनिक आहे. सोमवारी सकाळी डॉक्टर महिलेच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिंदी भाषेत बोलत मै कुरेशी बात कर रहा हू अभी मेरी बात ध्यान से सुनो तुम्हारे पतीने तुम्हीरी और तुम्हारे बच्चे की ५ लाख रुपये मे मर्डर करणे की सुपारी दि है..मै बच्चों की सुपारी नही लेता, तुम्हारे बच्चों को बचाना है तो ५ लाख रुपये दो, वैसे तो मुश्कील है, पर ये ही एक रास्ता बाकी है, असे बोलुन फिर्यादींच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत ५ लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान, डॉक्टर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेेषनाद्वारे तपास करत असताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांना बातमी मिळाली होती की, फोनद्वारे खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून राकेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याने डॉक्टर महिलेला कॉल केल्याचे समोर आले आले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम, घुले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक