शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मजूर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा

By admin | Updated: September 26, 2015 01:54 IST

पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहपकल्पावर काम करणारी मजूर महिला डोक्यात लाकडी वासा पडून ठार झाली.

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहपकल्पावर काम करणारी मजूर महिला डोक्यात लाकडी वासा पडून ठार झाली. या घटनेची नोंद आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. दबावामुळे पोलिसांना कारवाई करणे अडचणीचे झाले असताना, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर पोलिसांची धावपळ उडाली. अखेर तब्बल तीन दिवसांनी सांगवी पोलिसांनी या प्रकरणी बांधकाम व्यावसायिका कडील ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लाकडी वासा खाली काम करीत असलेल्या महिलेच्या डोक्यात पडला. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य मजुरांना लगेच सुटी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊ नये, याकरता दबाव तंत्रांचा अवलंब करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक, संबंधित ठेकेदाराने कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा साधने पुरवली नसल्याचे उघड होईल. निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, ही बाब निदर्शनास आली, तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. महिलेच्या वारसांना, कुटुंबीयांना भरपाई द्यावी लागेल. हे सर्व टाळण्यासाठी कोणालाही काही समजण्याच्या आत परस्पर प्रकरण मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला. लोकमतच्या वृत्तानंतर शुक्रवारी सायंकाळी पिंपळे सौदागर पोलीस चौकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)