शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मायेच्या पाझराला करावी लागतेय प्रतीक्षा

By admin | Updated: July 14, 2014 04:49 IST

मुलं वाढविण्याची संकल्पनाच इतकी सुखद, की स्वत:चे मूल नसले तरी दत्तक घेण्याची दांपत्यांची तयारी असते.

हिनाकौसर खान-पिंजार, पुणेमुलं वाढविण्याची संकल्पनाच इतकी सुखद, की स्वत:चे मूल नसले तरी दत्तक घेण्याची दांपत्यांची तयारी असते. मात्र, अनाथालयांमधील मुलांची संख्याच कमी होऊ लागली आहे, त्यामुळे जैवशास्त्रीय किंवा वैद्यकीयदृष्ट्या अडचणी असल्याने पालकत्वाचा अनुभव घेण्यात असमर्थ दांपत्यांच्या मायेच्या पाझराला प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्याच्या काळात करियरमुळेही दांपत्य आपला पाळणा लांबवतात. उशिरा लग्नानंतरही जोडीदाराला समजून घेणे, मौज करणे या कारणांमुळे कुटुंब नियोजनाचा कालखंड लांबवतात. शिवाय सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यातील ताण-तणाव, प्रदूषण, जीवनशैली याचाही परिणाम शरीरावर होत राहतो व त्यातूनही सुदृढ बाळ जन्माला घालण्याची आईची क्षमता किंवा वंध्यत्व अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पूर्वी मूल न होणं हा सामाजिक द्वेषाचा विषय होता. शारीरिक अडचणींना समजून न घेऊन या गोष्टीचा बाऊ केला जाई आणि त्यातूनच अशा जोडप्यांना अवहेलना सोसावी लागायची. मात्र, पालकत्वाचा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असली तरी काही वेळा शारीरिक पातळीवर तसेच जैवशास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या काही अडचणी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या वंध्यत्व निराकरणासाठी नवे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. फ्रोझन स्पर्म, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी असे पर्याय असले तरी ते महागडे आणि खात्रीशीर पर्याय नसतात, त्यामुळे आपोआपच पालक दत्तक स्वीकृतीकडे वळत आहेत. याबाबत ‘सोफोश’च्या संचालिका माधुरी अभ्यंकर म्हणाल्या, ‘वाढत्या वयामुळे आईपणाला अडचणी येत आहेत, त्यामुळे पालक मूल दत्तक घेऊन दोहोंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अनाथालयात आता मुले दाखल होण्याचे प्रमाणच घटले आहे. मुख्यत्वेकरून वैद्यकीय सेवा, एमटीपी, आय पील अशा सुविधा गावागावांत पोहोचल्याने मूल जन्माला घालून सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लग्नाला ३ ते ५ वर्षे झालेली जोडपी दत्तक घेण्यासाठी येतात. अगदी चाळिशीला पोहोचलेली जोडपी येतात. सध्या सोफोश संस्थेत ७३ पालक दीड ते दोन वर्षांच्या काळासाठी वेटिंगवर आहेत.’