शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदार चालकांचे कोविड लसीकरण प्राधान्याने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:09 IST

धनकवडी : कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशाचा कणा समजला जाणा-या माल आणि प्रवासी वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला असून वाहतूकदारांचे ...

धनकवडी : कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशाचा कणा समजला जाणा-या माल आणि प्रवासी वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला असून वाहतूकदारांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीतही वाहतूकदार आणि चालक देशाला लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, औषध व मेडिकलचे विविध साहित्य आणि कोरोनाच्या रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनची वाहतूक करत आहेत. चालक हे कोरोना योद्धे असून लसीकरणासाठी त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती ‌‌‘लोकमत’ला दिली.

शिंदे म्हणाले की, आमच्याकडील चालक जीवनावश्यक वस्तूंची साखळी अबाधित राहण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. काही चालकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. देशामध्ये जवळपास दोन कोटी वाहतूकदार चालक आहेत. त्यांच्यासाठी सर्व प्रमुख महामार्गावरील टोल नाके तात्पुरते बंद करून त्या ठिकाणी या सर्व चालकांना लवकरात लवकर कोविड लस मोफत देण्यात यावी. तसेच वाहतूक व्यवसायाशी संबंधित संलग्न व्यवसाय म्हणजे टायर, बॅटरी, गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकाने, गॅरेज व जेवणाचे धाबे हे व्यवसाय त्वरित सुरू केले जावेत. कोरोनाच्या कालावधीत वाहनांना करमाफी देण्यात यावी. तसेच इन्शुरन्स, बँक हप्ते आणि वाहनांची कागदपत्रे, परवाने काढणे यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी बाबा शिंदे यांनी नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

फोटो - बाबा शिंदे.