शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ; पुण्यातील लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 09:08 IST

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आणि प्रशासनाच्या बंधनांना पहिल्याच दिवशी सर्वपक्षीयांकडून हरताळ; धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे सर्वसामान्यांवर बंधने घातली जात असताना राजकारण्यांना वेगळे नियम आहेत का असा, सवाल आता उपस्थित होतो आहे. कारण पुण्यात पार पडलेल्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम नियम धाब्यावर बसवले गेल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क फिरणारी नेतेमंडळी असं चित्र या लग्नात पाहायला मिळालं.

पुण्यातल्या हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स याठिकाणी धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी देशमुख यांचा विवाह सोहळा काल पार पडला. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत, शरद पवार अशा अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. एकीकडे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करणे टाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला असताना थेट राजकारण्यांकडून हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या लग्नाला दोनशेहून अधिक लोकांनी तर हजेरी लावलीच पण त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले. लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी स्टेजवर जातानाही मास्क घातलेला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगदेखील पाळलं नव्हतं. तर काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली. याला वधू वरांसोबत धनंजय महाडिकदेखील अपवाद ठरले नाहीत. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यामध्ये कालपासून नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर लग्नांना दोनशे लोकांची मर्यादा तसेच पोलीस परवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नियम राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर अशा सोहळ्यांना ही लागू असतील असं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. नियम पाळले गेले नाहीत तर कारवाई होईल अशी घोषणा झाली आहे. मात्र ही घोषणा झाल्याच्या दिवशीच हा संपूर्ण प्रकार बघायला मिळाल्यामुळे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. नियमांचे पालन न झाल्याने आता प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का हे पहावे लागेल. 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊत