बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण

By Admin | Updated: September 22, 2014 05:34 IST2014-09-22T05:34:52+5:302014-09-22T05:34:52+5:30

बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या दोन तगड्या इच्छुकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी मोकळी वाट करून दिली

Covering positions on rebelliousness | बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण

बंडखोरीच्या ईर्षेवर पदांचे पांघरूण

पुणे : बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या दोन तगड्या इच्छुकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी मोकळी वाट करून दिली. हवेली-शिरूर मतदारसंघातून बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले प्रदीप कंद आणि खडकवासला मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत असलेले शुक्राचार्य वांजळे यांना अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपद दिले गेल्याने हवेली तालुक्यात प्रथमच दोन्ही पदे आली.
कंद यांनी हवेली शिरूर मतदारसंघातून लढण्यासाठी अडीच वर्षांपासून तयारी चालविली होती. विकासकामांच्या तुलनेत विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावर कडी करून ते राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंंवा अन्य पक्ष यांचा पर्याय पाहत होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कंद यांनी मागणी केली नव्हती किंवा अर्जही केला नव्हता. विश्वास देवकाते, निवृत्ती गवारे, शांताराम इंगवले अशा ९ प्रबळ इच्छुकांवर मात करून त्यांना अध्यक्षपदासाठी संधी देण्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हवेली शिरूर मतदारसंघातील गणित होते. कंद यांनी उमेदवारी दिली असती तर हवेलीच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला विरोध सहन करावा लागण्याची शक्यता होती़ कंद यांना जिल्ह्याचे नेतृत्व सोपवून हवेली शिरूरच्याच नव्हे, जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
शुक्राचार्य हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे बंधू असून, खडकवासला मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत लढण्याच्या पवित्र्यात होते. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या वहिनी हर्षदा वांजळे यांनी निकराची झुंज दिली होती. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे २६ इच्छुकांनी उमेदवारीच्या मागणीमुळे पेच झाला होता. शुक्राचार्य वांजळे हे त्यातील प्रमुख दावेदार होते. त्यांना उपाध्यक्षपदी संधी देऊन राष्ट्रवादी खडकवासला मतदारसंघातील स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न चालविल्याचे सांगितले जाते.

Web Title: Covering positions on rebelliousness