शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

एक विवाह ऐसा भी : आहेरात मिळालेल्या १२०० पुस्तकातून 'सचिन-शर्वरी' सुरु करणार वाचनालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 1:53 PM

लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरु असताना पुण्यात मात्र एका तरुण जोडप्याने आदर्श निर्माण केला आहे. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेल्या या जोडप्याने आहेर स्वीकारला पण फक्त पुस्तकांचा.

पुणे : लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरु असताना पुण्यात मात्र एका तरुण जोडप्याने आदर्श निर्माण केला आहे. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेल्या या जोडप्याने आहेर स्वीकारला पण फक्त पुस्तकांचा. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी भरभरून आहेर करत १२०० पुस्तके दिली. आता या पुस्तकातून ते दोन वाचनालये सुरु करणार आहेत.                     पुण्यात मासिक पाळी 'समाजबंध' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मासिक पाळी व महिला आरोग्य या विषयावर कार्यरत असणाऱ्या सचिन आशा सुभाष व सामाजिक कार्यकर्ती असून प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थापक असणारी शर्वरी सुरेखा अरुण यांनी त्यांचे लग्न फक्त आदर्श नव्हे तर विधायक पद्धतीने केले. या लग्नात त्यांनी केवळ डिजिटल माध्यमात प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेत स्पष्टपणे 'केवळ  पुस्तकरूपी आहेर स्वीकारण्यात आनंद आहे' असे नमूद केले होते. या लग्नात त्यांना थोडा थोडका नव्हे तर तब्बल १२०० पुस्तकांचा आहेर आला. त्यात सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमधून सचिनच्या मूळ गावी अर्थात कित्तूर, ता. करमाळा  जि.सोलापूर आणि शर्वरीच्या चंदगड, ढोलगारवाडी, जि, कोल्हापूर दोन वाचनालये सुरु  केली जाणार आहेत.                     सचिन आणि शर्वरीने लग्नाच्या आधी देवदर्शन म्हणून भामरागड, आनंदवन येथे त्यांच्याच भाषेत सांगायचे तर माणसातले देव राहतात त्या तीर्थस्थळांना भेट दिली .लग्न झाल्यावर सासरी गेलेल्या शर्वरीने संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात विवेकी सहजीवन पुस्तकाचे वाण दिले तर त्याच कार्यक्रमात मासिक पाळी विषयाचे समुपदेशनही केले. या विषयावर सचिन म्हणतो, 'दीड वर्षांपूर्वी लातूर मधील एका मुलीने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती, त्यावेळी मी का 'हुंडा घेणार नाही व देणार नाही' अशी शपथ घेऊन तसे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. त्यानुसार लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत जो काही खर्च होईल तो आम्ही दोघांनी मिळून केला. शर्वरी सांगते, 'लग्नाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आमची पद्धतीचे अनुकरण व्हावे अशी इच्छा आहे. जात, धर्म विचारात न घेता सामाजिक उत्तरदायित्वाने लग्न झाले तर गावोगावी वाचनालय उभं राहून येणाऱ्या पिढीची बौद्धिक भूक वाढवण्यास आपण यशस्वी राहू. 

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नsocial workerसमाजसेवक