शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News Pune: वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण उपचारासाठी बेड कमी पडू देणार नाही: विक्रम कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 18:04 IST

पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असताना होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

पुणे: पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महापालिका व आरोग्य विभाग प्रशासन कोरोना विरुद्धच्या लढाईत युद्धपातळीवर कार्यरत आहे.मात्र, वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विक्रम कुमार यांनी दिली आहे.

पुणे महानगरप्पालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय यंत्रणेवर भाष्य केले. विक्रम कुमार म्हणाले,  बाणेर येथील इएसआय रुग्णालय ताब्यात घेणार असून १३० बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याचा प्रयत्न  सुरू आहे. पुढील पाच दिवसांत ५० व्हेंटिलेटर वाढवणार आहोत. आता एकूण ४०० ऑक्सिजन बेड शिल्लक असून आणखी ३५० बेड्स पुढील ३ते ४ दिवसात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. 

शहरातील आणखी ६ खासगी रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करू, पण कुठल्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी जास्तीत जास्त हॉस्पिटल ताब्यात घेतले जातील. सध्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ८००पैकी ६००बेड्स कार्यरत आहेत. तसेच ५० ऑक्सिजन व ३० व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.

आजमितीला शहरात महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण २५ हजार र खासगी रुग्णालयांकडे ४५ हजार डोस शिल्लक आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण १२५ केंद्र सुरू आहे. दररोज २० ते २२ हजार लोकांना लसींचा डोस दिला जात आहे. मागील ३० दिवसांत ५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती विक्रम कुमार यांनी यावेळी दिली. होम आयसोलेशन रुग्णांनी घरी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. 

रेमीडिसिव्हरचा प्रश्न मार्गी लागेल...शहरात आज २००० तर उद्या आणखी जास्त रेमीडिसिव्हर औषधांचा साठा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे रेमीडिसिव्हर चा निर्माण झालेला तुटवडा भासणार नाही.

पुणे महापालिकेचे कॉल सेंटरकडे खासगी संस्थेकडे चालवायला देण्यात येणार आहे. दररोज ५००फोन येत असून १५ हेल्प लाईन कार्यरत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त