corona virus ; पुण्यात आज तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; नवे १७ रुग्ण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:14 PM2020-04-07T18:14:57+5:302020-04-07T18:16:35+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून पुण्यात मंगळवारी मृतांच्या संख्येत तीनने भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित मृतांचा आकडा आठवर येऊन पोचला आहे. 

corona virus; Three corona patients died in Pune today; Found 17 new patients | corona virus ; पुण्यात आज तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; नवे १७ रुग्ण आढळले 

corona virus ; पुण्यात आज तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ; नवे १७ रुग्ण आढळले 

Next

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून पुण्यात मंगळवारी मृतांच्या संख्येत तीनने भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित मृतांचा आकडा आठवर येऊन पोचला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज ही संख्या १५९वर पोचली आहे. मंगळवारी शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून सोमवारी ही संख्या ३७वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांनी आता अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे. उर्वरित शहरातही कडक नियम बनवण्यात आले असून कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

सोमवारी अचानक वाढलेल्या आकड्यानंतर पुणे शहर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहराचा पूर्व भाग सील केला असला तरी आजच्या रुग्ण संख्येनंतर इतर भागातही बंधने लागू केली जाऊ शकत आहेत. १४ तारखेपर्यंतचा लॉकडाऊन उठण्यास आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. त्यामुळे गरज पडल्यास लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होऊ शकते. सध्या नायडू हॉस्पिटलसह इतर काही रुग्णालयातही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर १७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

दरम्यान मंगळवारी सकाळी ९ ते ११च्या दरम्यान या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तीनही मृत व्यक्तींचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असून त्यातील दोघांना मधुमेह व रक्तदाबाचा आजार असल्याचे समजते.

Web Title: corona virus; Three corona patients died in Pune today; Found 17 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.