शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : ससूनमधून पाच दिवसांतच रुग्ण घरी; दहा दिवस होण्यापूर्वीच मिळतोय डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:16 IST

मागील काही दिवसांत २० हून अधिक रुग्णांना दहा दिवस रुग्णालयात होण्यापुर्वीच घरी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देसलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित

राजानंद मोरेपुणे : ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी लक्षणे सुरू झाल्याच्या दिवसापासून पुढील दहा दिवसांचा कालावधी डिस्चार्जसाठी ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत २० हून अधिक रुग्णांना दहा दिवस रुग्णालयात होण्यापुर्वीच घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णालयात दहा दिवस होण्यापुर्वीच घरी सोडण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या  आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. पुर्वी सर्व कोरोनाबाधित रुग्णांना १४ दिवसांनंतर दोनदा चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जात होते. नवीन प्रोटोकॉलमुळे घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. ससून रुग्णालयामध्ये सुरूवातीला या प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतर रुग्णांना घरी सोडले जात होते. पण मागील काही दिवसांपासून हा प्रोटोकॉल बदलण्यात आल्याचे दिसते. महापालिका तसेच काही खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतरही घरी सोडण्यात येत आहे.ससून रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी दोन प्रसुती झालेल्या महिलांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या सातव्या दिवशी तर एका प्रसुती झालेल्या महिलेला सहाव्या दिवशी तसेच दि. २९ मे रोजी आणखी एका प्रसुती झालेल्या महिलेला पाचव्या दिवशीच घरी सोडण्यात आले. इतर काही रुग्णांनाही सहा ते नऊ दिवसांत घरी सोडण्यात आले आहे. दि. २५ मे पासून या रुग्णांचा आकडा जवळपास २० हून अधिक आहे. याबाबत रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ह्यकेंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच डिस्चार्ज दिला जात आहे. लक्षणे असल्यापासूनचे पुढील दहा दिवस गृहित धरले जात आहेत. घरी सोडण्यापुर्वी सलग तीन दिवस लक्षणे नसल्याबाबत तपासणी केली जाते. त्यानंतर घरी सोडण्यात येते. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना दिल्या जातात.ह्ण दरम्यान, याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.--------------प्रोटोकॉलनुसार रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर पुढील दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. त्यानुसार पालिकेच्या रुग्णालये व कोविड सेंटरमधून तीन दिवस लक्षणे नसलेल्या रुग्णांना दहा दिवसांनी घरी सोडले जात आहे.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका--------------रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. त्यासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढचे दहा दिवसांनी प्रोटोकॉलप्रमाणे घरी सोडण्यात येते.- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पीटल--------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका