शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

corona virus ; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी बजाज ग्रुपतर्फे शंभर कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 9:29 AM

कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच्या वतीने राहुल बजाज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे : कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच्या वतीने राहुल बजाज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गेल्या 130 वर्षांपासून बजाज उद्योगसमुह समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या कोरोना विषाणू विरोधातील लढ्यातदेखील आमचा सहभाग असेल, असे बजाजने स्पष्ट केले आहे. कोविड -19 च्या विरोधात लढण्यासाठी पुण्यातील आरोग्य सेवांमधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करु. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागांचे आधुनिकीकरण, वेंटिलेटरची उपलब्धता यासह व्यक्तिगत जीवनदायी संरक्षण उपकरणांची खरेदी, चाचणीसाठी आवश्यक सुविधा आदींसाठी मदत करण्याचा इरादा बजाजने जाहीर केला आहे. पुण्यासह, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही ही मदत दिली जाईल.

हातावर पोट असणाऱ्या रोज मजुरी करुन जगणाऱ्या कामगारांसाठी, बेघर आणि पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी आम्ही तातडीने काही संस्थांसोबत काम करत आहोत. गेल्या काही आठवड्यांत खेड्यांमध्ये स्थलांतर वाढले आहे. ग्रामीण भागातील जगणे सुसह्य करण्यासाठी थेट अनुदान, रोजगाराच्या संधी यासाठी आम्ही प्रयत्न करु. ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्रे आणि इतर आवश्यक सुविधांच्या बळकटीकरणासाठी आम्ही निधी खर्च करु, असे बजाज यांनी म्हटले आहे. 

आरोग्य सेवा, स्वच्छता आणि आपत्कालीन सहाय्य कामगार आणि स्थानिक पोलिसांना सलाम करतो, या शब्दात राहूल बजाज यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या साथीच्या रोगाचा लढा देण्यासाठी शक्य त्या मार्गाने मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे बजाज यांनी नमूद केले आहे. राहुल बजाज यांच्या या औदार्याचे त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले आहे. पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांना धन्यवाद दिले असून बजाज यांनी कुटुंब परंपरेचे मूल्य आणि वारसा स्वीकारल्याचे म्हटले आहे. राहुल बजाज हे नेहमीच देशासाठी अतिशय उदारपणे मदत करत असल्याचेही पवारांनी म्हटले आहे.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याsocial workerसमाजसेवक