शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : आंबेगाव तालुका होतोय रेड झोन; तालुक्यात एकाच दिवसात आढळले १५ रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 22:25 IST

आंबेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आंबेगाव तालुक्यात एकूण २५ कोरोनाबाधित असून, त्यापैकी एक बरा झाला आहे...

ठळक मुद्देआंबेगाव तालुक्यात एकूण २५ कोरोनाबाधित, त्यापैकी एक बरा

मंचर : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक झाला आहे. तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये वडगाव काशिंबेग येथे सात रुग्ण, तर फदालेवाडी ३, पेठ येथे २ तर एकलहरे, घोडेगाव, शिनोली येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तालुक्यात एकूण २५ कोरोनाबाधित असून, त्यापैकी एक बरा झाला आहे.जिल्ह्यात आंबेगाव तालुका सुरुवातीला कोरोनामुक्त होता. मात्र, मुंबईवरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत दहा रुग्ण सापडले होते. त्यापैकी शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.  गुरुवारी तालुक्यातून ५० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आंबेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.वडगाव काशिंबेग येथील ४७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच्या घरातील १३ जणांचे नमुने तपासणीसाठी नेले असता ६ जण पॉझिटिव्ह निघाले.  वडगाव काशिंबेग गावातील दुसरा एक  पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. फदालेवाडी येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर पेठ येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या घोडेगावतही एक रुग्ण आढळला आहे. शिनोली, एकलहरे येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  वडगाव काशिंबेग गावात आढळले. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तातडीने गावात येऊन सूचना दिल्या. प्रांत जितेंद्र डूडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी  जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. सुरेश ढेकळे यांनी तातडीने रुग्ण सापडलेल्या गावात जाऊन प्रशासकीय काम सुरू केले आहे.चौकट :कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कालच मंचर येथे आढावा बैठक घेऊन सरकारी व खासगी वैद्यकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने वळसे-पाटील स्वत: बारीक लक्ष ठेवून आहेत.

बाधित गावे प्रतिबंधित क्षेत्र जाहीरघोडेगाव : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने या आठ गावांतील प्रतिबंधित क्षेत्र पूर्णत: बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी-कोटमदरा, गिरवली, एकलहरे व वळती या आठ गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. आता या गावांमध्ये कोरोना सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये साकोरे येथे ७ सर्वेक्षण पथक, शिनोली येथे १६, निरगुडसर येथे ३७, जवळे ५, वडगाव काशिंबेग १६, पिंगळवाडी -कोटमदरा १५, गिरवली ११ व वळती २३ असे एकंदरीत १२८ सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये १७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :ambegaonआंबेगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस