Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:52 IST2021-10-13T18:52:39+5:302021-10-13T18:52:53+5:30

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

corona vaccination in pune 250 Covishields at 188 centers in the pune city on thursday | Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड

Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड

पुणे : शहरातील १८८ केंद्रांवर गुरुवारी १४ तारखेला प्रत्येकी २५० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ४०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा १६ सप्टेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे़ लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: corona vaccination in pune 250 Covishields at 188 centers in the pune city on thursday