शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील कोरोना लसीकरण मोहीम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:54 IST

आतापर्यंत ५३ हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण

ठळक मुद्देडोस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली

बारामती: बारामती तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहीम आज लसीअभावी बंद पडली आहे. तर इंदापूर तालुक्यात कोरोना लसीअभावी लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी कोरोना लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक पाहता केंद्राकडून सर्वाधिक लसींचा पुरवठा राज्याला होणे गरजेचे होते. अशी राज्य सरकारकडून मागणी केली जात आहे. लशीच्या तुटवड्यावरून केंद्र-राज्य सरकारमधील संघर्षाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लसीकरण केंद्र बंद होण्यास सुरुवात झाली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लसीकरणासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले. 

बारामतीमध्ये आतापर्यंत ५३ हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन अस्वस्थ झाले आहे. बारामतीमध्ये कोरोना संक्रमित दैनंदिन रुग्ण संख्या ३०० च्या घरात पोहचली आहे. अशा परिस्थितीत कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम महत्वाची मानली जाते. मात्र राज्य सरकारकडेच पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्याचाच फटका बारामती आणि इंदापूर येथील लसीकरण मोहिमेला बसला आहे.

कालपासून लसीचा तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे इंदापूर, बारामतीतील लसीकरण आज पूर्णपणे बंद आहे. डोस मिळाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू होईल.

                                                                                                                                    - दादासाहेब कांबळे                                                                                                                        उपविभागीय अधिकारी बारामती

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस