शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रिक्षाचालकांना जगण्याची भ्रांत ; उत्पन्न बंद, कर्जाचे हप्ते डोक्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 09:15 IST

सुरूवातीच्या बंद काळात बचतीचे पैसे संपले, आता करायचे काय, पैसे मिळवून देणारी रिक्षा तर जागेवरच, मग आता खायचे काय अशी चिंता या मोठ्या वर्गासमोर निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देराज्यात किमान संख्या 30 लाखफक्त पुण्यातच ८० हजार रिक्षाचालक

पुणे: कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीमुळे राज्यातील ७ लाख  रिक्षाचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पन्नच थांबल्याने कुटुंब जगवायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. फक्त पुण्यातच ८० हजार रिक्षाचालक आहेत. राज्यातील त्यांची संख्या ७ लाख आहे. मालक, चालक अशां दोन्हींचा त्यात समावेश आहे. रिक्षा चालवायची व पेट्रोल खर्च वजा जाता शिल्लक राहतील त्यातून घर चालवायचे हेच त्यांचे जगणे आहे. प्रत्येकावर किमान चार जण अवलंबून समजले तरी त्यांचीच संख्या २८ लाख होते. सुरूवातीच्या बंद काळात बचतीचे पैसे संपले, आता करायचे काय, पैसे मिळवून देणारी रिक्षा तर जागेवरच, मग आता खायचे काय अशी चिंता या मोठ्या वर्गासमोर निर्माण झाली आहे.

त्यातही अनेकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या आहेत. त्या कर्जाचे हप्ते त्यांच्या डोक्यावर आहेत. ते थकणार व त्याबरोबरच जगणेही अवघड होणार अशी या रिक्षाचालकांची अवस्था झाली आहे. पुर्ण संचारबंदी व तीसुद्धा इतके दिवस यामुळे ते अडचणीत आले आहेतरिक्षाचे ते मालक चालक असले तरी या व्यवसायावर सरकारचेच नियंत्रण आहे. कराच्या माध्यमातून सरकार रिक्षाचालकांकडून दरवर्षी कोट्यवधी रूपये वसूल करते. फक्त विम्याचे म्हणूनच एका रिक्षाचालकाकडून वार्षिक ७ हजार रूपये वसूल केले जातात. या पैशांचा त्यांना कोणत्याच स्वरूपात परतावा होत नाही.

त्यामुळेच यातून रिक्षाचालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केली. मदतीचा एक आराखडाच त्यांनी सरकारला सादर केला आहे. कोरोना आपत्तीत या मागण्यांचा विचार व्हावा असे त्या़चे म्हणणे आहे. रिक्षाचे कर्ज असलेल्या रिक्षा चालकांना त्यांचे कर्जाचे तीन महिन्याचे हप्ते माफ करावेत.रिक्षाचालकांना किमान ५ हजार रूपयांची मदत द्यावीत्यांना बंद काळात रेशन देण्याची व्यवस्था निर्माण करावी असे  पवार यांनी सांगितले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस