शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे चाकणच्या बाजारातील उलाढाल थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:10 IST

चाकण : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होऊ लागला आहे. रविवारी ...

चाकण : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होऊ लागला आहे. रविवारी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डातील बाजारावरही कोरोनाचा परिणाम दिसून आला. गेल्या आठवड्यात या बाजारात ४ कोटी ८० लाखांची उलाढाल झाली. त्या तुलनेत रविवारच्या बाजारात उलाढाल ९० लाखांनी कमी होऊन ३ कोटी ९० लाखांची उलाढाल झाली.

बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात प्रचंड घसरण झाली. तळेगाव बटाट्याची किंचित आवक वाढूनही बाजारभावात स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक कमी झाल्याने भाव स्थिर राहिले. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. गाजर व वाटण्याची आवक घटूनही भाव घसरले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व शेपू भाजीची आवक वाढली तर कोथिंबीरीची भाजीची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हैशीच्या संख्येत घट झाली तर शेळ्यांमेंढयांच्या संख्येत वाढ झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याच्या भावात १,८०० रुपयांची मोठी घसरण झाली.तळेगाव बटाट्याची एकूण १०५० आवक क्विंटल झाली.मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक ५० क्विंटलने वाढूनही बाजारभाव स्थिर राहिले. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक ८ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक १६ क्विंटलने घटूनही बाजारभाव ८,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमूग शेंगांची ३० क्विंटल आवक होऊनही भाव ८,००० पोहचले.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २४३ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे:

कांदा - एकूण आवक - ५,००० क्विंटल. भाव क्रमांक १. २,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १,०५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ६२ पेट्या ( ५०० ते १,००० रू. ), कोबी - १५५ पोती ( १०० ते ३०० रू. ), फ्लॉवर - १४७ पोती ( ६०० ते १,२०० रु.),वांगी - ६४ पोती ( १,००० ते २,००० रु.). भेंडी - ५० पोती ( ३,००० ते ४,००० रु.),दोडका - ३९ पोती ( २,००० ते ३,००० रु.). कारली - ४९ डाग ( २,५०० ते ३,५०० रु.). दुधीभोपळा - ३३ पोती ( ५०० ते १,००० रु.),काकडी - ३७ पोती ( ५०० ते २,००० रु.). फरशी - १४५ पोती ( २,००० ते ३,००० रु.). वालवड - २६ पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - १५ पोती ( ४,००० ते ६,००० रू.), ढोबळी मिरची - ४९ डाग ( १,००० ते २,००० रु.). चवळी - १४ पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ), वाटाणा - ७३ पोती ( २,००० ते ३,००० रुपये ), शेवगा - १३ पोती ( ३,००० ते ५,००० रुपये ), गाजर - १२३ पोती ( ६०० ते १,२०० रु.).

पालेभाज्या

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख ४० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ७५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,४०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते १,००० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण २८ हजार ५४५ जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), कोथिंबीर - एकूण १९ हजार ७६० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), शेपू - एकुण २ हजार ५२० जुड्या ( ६०० ते १,००० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ८५० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या ९५ जर्शी गायींपैकी ६५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रुपये ), १२५ बैलांपैकी ७५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १६० म्हशींपैकी ११० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,८०० शेळ्या - मेंढ्यापैकी ९,३०० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

२८ चाकण

चाकण बाजारात वांग्याचा लिलाव.