शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 5:33 PM

आधीच स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतानाच आता पुरंदरच्या माजी आमदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस आमदारावर केलेत गंभीर आरोप...

पुणे : महाविकास आघाडीत सारं काही ठीकठाक आहे आणि हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार अशी ग्वाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेमंडळी देत असतात. मात्र, असं असलं तरीही महाविकास आघाडीतील तीन सहभागी पक्षात सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे उडणारे खटके देखील लपवून राहिलेले नाही. आधीच स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतानाच आता माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते विजय शिवतारे यांनी पुरंदरच्या काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिलं आहे.

२०१९ च्या निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव करत काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते. मात्र,आता महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र असताना येथील आजी - माजी आमदारात श्रेय वादावरून चांगलेच खटके उडाले आहे. आणि यावेळी शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत काँग्रेसचे विद्यमान आमदारावर निशाणा साधला आहे. यात त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहे. 

विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीत पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे काम मार्गी लावले. तसेच पुरंदर तालुक्यात आत्ता जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम स्थानिक आमदाराकडून होत आहे. अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. स्थानिक आमदार संजय जगताप यांचा या कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजत आहे, असेही विजय शिवतारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

शिवतारे यांनी पत्रात या सर्व कामांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी केली आहे. तसेच हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात झाला तरी हरकत नाही असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.

विजय शिवतारे कौटुंबिक वादानंतर चर्चेत.. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद नुकताच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे हृदयविकाराच्या झटक्यानंतर शिवतारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना कौटुंबिक वादाने तोंड वर काढले आहे. शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे यांनी फेसबुकवरून पोस्ट लिहीत आपल्या आई आणि भावांवर आरोप केले आहे. तर ममता यांच्या आरोपाला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पती विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत” असा दावा देखील त्यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणPurandarपुरंदरUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसMLAआमदार