Join us  

विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 5:02 PM

विकीने आऊटसाइडर असूनही आपल्या टॅलेंटमुळे इंडस्ट्रीत वेगळी ओळख बनवली.

'राजी','मसान' सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणारा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. विकी कौशल आगामी 'छावा' या सिनेमात छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं शूट पूर्ण झालं. सिनेमातील त्याच्या लूकची झलकही चाहत्यांना दिसली.

विकीने आऊटसाइडर असूनही आपल्या टॅलेंटमुळे इंडस्ट्रीत वेगळी ओळख बनवली. यामुळेच आज त्याच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असतात. विकीने एका मुलाखतीत त्याची अपुरी राहिलेली इच्छा बोलून दाखवली होती. तो म्हणाला होता की,"मला निगेटिव्ह भूमिका साकारायची आहे.  अशा भूमिकांमध्ये बरंच काही करता येतं. अभिनयाला वाव असतो. म्हणूनच माझी नकारात्मक किंवा ग्रे शेडेड भूमिका साकारण्याची इच्छा आहे. मला माहित नाही हे कधी होईल पण मी नक्कीच करेन."

विकी कौशलचे आगामी अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'छावा' सोबतच त्याचा तृप्ती डिमरीसोबत 'बॅड न्यूज' हा सिनेमा येतोय.याचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. तसंच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात विकी रणबीर आणि आलियासोबत दिसणार आहे.

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूड