शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरालगत थिगळस्थळ येथे सिमेंट-विटा वाहतूक करणाऱ्या कंटेनर आणि ट्रकचा अपघात झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरालगत थिगळस्थळ येथे सिमेंट-विटा वाहतूक करणाऱ्या कंटेनर आणि ट्रकचा अपघात झाला. दरम्यान अन्य चार वाहनांनी पघातग्रस्त ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजुने वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या विचित्र अपघातामुळे पहाटेपर्यंत वाहतूककोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर नाशिक बाजुने सिमेंटच्या विटा घेऊन एक कंटेनर पुणे बाजुकडे जात होता. कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट नाशिककडे जाणाऱ्या ट्रकवरती येऊन आदळला. तसेच कंटेनरमध्ये भरलेल्या विटा रस्त्यावर कोसळल्या.

दरम्यान अचानक झालेल्या या अपघातामुळे दोन्ही वाहनांच्या मागून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज न आल्याने या वाहनांचा अपघात झाला. या विचित्र अपघातामध्ये दोन जणांना दुखापत झाली आहे. चार वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेऊन आपघातग्रस्त वाहने बाजुला केली. रस्त्यावर सिमेंट विटांचा खच पडला असल्यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यास अडथळा निर्माण होत होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजुला करून रस्त्यावरील सिमेंट विटा हटविण्यात आल्या. त्यामुळे वाहतूककोंडीला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजुने दोन-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी मंगळवारी (दि. २) पहाटेचे तीन वाजले.

पुणे -नाशिक महामार्गालगत थिगळस्थळ येथे एका बाजुने कंपन्याच्या बसेस रात्रीच्या उभ्या असतात. त्यामुळे महामार्ग अरुंद होतो. वाहनचालकांना या ठिकाणी वाहने चालविताना अडचण निर्माण होते. विशेषत: जड वाहनचालाकांना या ठिकाणी मोठी काळजी घ्यावी लागते. तसेच पानमळा येथे नवीन घाट मार्ग ज्या ठिकाणी जोडण्यात आला आहे. त्या ठिकाणी भाजीविक्रेते महामार्गालगत बसत आहे. त्यामुळे येणारे जाणारे वाहनचालक या ठिकाणी रस्त्यावरच गाड्या उभ्या करून भाजी खरेदी करत असतात. यापूर्वी या ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहे. याकडे वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

फोटो ओळ: पुणे-नाशिक महामार्गावरील थिगळस्थळ येथील अपघातग्रस्त वाहने.