शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात ग्राहक, गुंतवणूकदारांची ‘मार्केट’वापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST

पुणे : कोरोनाकाळात रिअल इस्टेट क्षेत्राने मोठी मंदी अनुभवली. नव्या वर्षात स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची ...

पुणे : कोरोनाकाळात रिअल इस्टेट क्षेत्राने मोठी मंदी अनुभवली. नव्या वर्षात स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची ‘मार्केट’ वापसी पाहायला मिळत आहे. ग्राहकांना संकटकाळात दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व पटले आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून जाहीर होत असलेल्या आकर्षक योजना, स्टॅम्प ड्युटीमधील सवलती यामुळे ग्राहकांना घराच्या एकूण किमतीवर ५ ते १५ टक्क्यांपर्यंत आर्थिक लाभ मिळणे शक्य झाले आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचे संकट आणि त्यामुळे लागलेल्या टाळेबंदीने आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाला. मात्र, या काळात लोकांना स्वत:च्या मालकीच्या घराचे महत्त्वही पटले. त्यामुळे नवीन वर्षात स्वत:चे घर घेण्याकडे ग्राहकांचा कल पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यापर्यंत मार्केटमध्ये पूर्ववत तेजी अनुभवायला मिळेल, असाही अंदाज बांधला जात आहे. बँकांकडून कमी करण्यात आलेल्या व्याजदरांमुळेही सामान्यांना दिलासा मिळाला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना बऱ्याच कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरली. भविष्यात ही संकल्पना कायमस्वरूपी राबवली जाऊ शकते. याचाच विचार करूनही परवडणाऱ्या दरांमध्ये स्वत:च्या घराचा पर्याय निवडण्याकडे कल आहे.

निवारा ही माणसाच्या मूलभूत गरजेपैकी एक मानली जाते. एकीकडे घरभाड्यांमध्ये झालेली वाढ, कराराच्या नियमावली, दर अकरा महिन्यांनी घर बदलण्याची वेळ, घराच्या वापरावर येणारी बंधने यामुळे नागरिक भाड्याने घर घेण्यापेक्षा स्वत:च्या घराला प्राधान्य देत आहेत. दर महिन्याला भराव्या लागणाऱ्या घरभाड्याच्या रकमेइतका कर्जाचा मासिक हप्ता भरुन स्वत:चे घर घेण्याला पसंती देताना दिसत आहेत.

आजवर जमीन खरेदी करण्याकडे केवळ उच्च मध्यमवर्गीयांचाच कल दिसून येत होता. आता जमिनीच्या किमती कमी झाल्यामुळे आणि कमी किमतीत आपल्याला हवे तसे घर बांधणे शक्य असल्याने प्लॉट विकत घेण्याची टक्केवारी या वर्षी १५-२० टक्क्यांनी वाढीस लागेल, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

‘२०२२ पर्यंत प्रत्येकासाठी घर’, प्रधानमंत्री आवास योजना अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे परवडणारी घरे सामान्यांच्या आवाक्यात येत आहेत. आलिशान घरांपेक्षा पर्यावरणपूरक घरांकडे जास्त कल वाढत आहे. त्यामुळे या वर्षी रिअल इस्टेट क्षेत्राला आणखी चालना मिळणार आहे.