Pune Crime: बांधकाम व्यावसायिक पित्याकडून मुलाच्या हत्येचा कट; पुण्यातील 'त्या' गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरवणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:52 IST2026-04-01T20:52:34+5:302026-04-01T20:52:47+5:30

१६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज रस्ता परिसरात मुलावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आला. परंतु पिस्तुलातून गोळी न उडाल्याने मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरून हल्लेखोर पसार झाले होते

Construction worker father plotted to kill son; Gun supplier arrested in Pune shooting case | Pune Crime: बांधकाम व्यावसायिक पित्याकडून मुलाच्या हत्येचा कट; पुण्यातील 'त्या' गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरवणारा अटकेत

Pune Crime: बांधकाम व्यावसायिक पित्याकडून मुलाच्या हत्येचा कट; पुण्यातील 'त्या' गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरवणारा अटकेत

पुणे : कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाख रुपयांची सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. जंगली महाराज रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्यानंतर पिस्तूल पुरवणारा आरोपी पसार झाला होता.

निलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज रस्ता परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरून हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कौटुंबिक वादातून बांधकाम व्यावसायिक पित्याने मुलाची हत्या करण्यासाठी दोघांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह हल्लेखोरांना अटक केली होती.

गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरवणारा आरोपी गायकवाड हा पसार झाला होता. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत होते. त्या वेळी गायकवाड हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कामगिरी केली.

Web Title : पुणे: बेटे की हत्या की पिता की साजिश; बंदूक आपूर्तिकर्ता गिरफ्तार।

Web Summary : पुणे पुलिस ने हत्या की साजिश में पिस्तौल आपूर्ति करने वाले एक व्यक्ति को गिरफ्तार किया। पारिवारिक विवादों के चलते एक पिता ने अपने बेटे को मारने के लिए सुपारी दी। शूटर विफल रहा, जिसके कारण बंदूक आपूर्तिकर्ता सहित गिरफ्तारियां हुईं।

Web Title : Pune: Father's murder plot against son; gun supplier arrested.

Web Summary : Pune police arrested a man who supplied the pistol in a foiled murder plot. A father paid hitmen to kill his son over family disputes. The shooter failed, leading to arrests, including the gun supplier.