शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

भाजपाच्या पराभवाच्या आनंदात काँग्रेस, मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 8:38 PM

पुण्यात काँग्रेससह मनसे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सेलिब्रेशन करत एकत्र ताल धरला. पुण्यात ज्या संत बसवराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपने १५ तारखेला विजयाचे ढोल वाजवले त्याच ठिकाणी सर्वपक्षीयांनी त्यांचा पराभव साजरा केला.

ठळक मुद्दे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह मनसेचा एकच ताल भाजपच्या पराभवामुळे जमला असा पुणे पॅटर्न  

पुणे : कर्नाटक विधानसभेत बी एस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेससह जेडीएस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. पण त्याही पुढे जात पुण्यात काँग्रेससह मनसे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सेलिब्रेशन करत एकत्र ताल धरला. पुण्यात ज्या संत बसवराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपने १५ तारखेला विजयाचे ढोल वाजवले त्याच ठिकाणी सर्वपक्षीयांनी त्यांचा पराभव साजरा केला.

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.आणि अखेर  कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर पडदा पडला. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. या घटनेमुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित सत्तेचा दावा करण्यास पात्र ठरले आहेत. याचे जोरदार सेलिब्रेशन पुणे शहर काँग्रेसने केल्याचे  बघायला मिळाले.पण त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनीही तालसे ताल मिळवत भाजपचा पराभव साजरा केला. 

हे सर्वपक्षीय सेलिब्रेशन करण्याचे कारण म्हणजे भाजपने हिटलरशाही पद्धतीने राजकारण खालच्या पातळीवर नेवून ठेवलेल्या राजकारणाला चपराक बसल्याने केल्याचे मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण त्यामुळे काळ सोकावत होता. भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून लोकशाहीला झुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना बसलेल्या दणक्याचे सेआम्ही एकत्रित लिब्रेशन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात काँग्रेसच्या कमल व्यवहारे, हृषीकेश बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रसचे अजय दराडे, संग्राम होनराव, शिवसेनेचे नितीन परदेशी, चंदन साळुंके, मनसेचे वसंत खुटवड, मनीषा कावेडिया आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Floor Testबहुमत चाचणीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMNSमनसे