शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

कोलवडीत दिवसभर तणाव

By admin | Updated: August 20, 2015 02:37 IST

कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केली असून पोलिसांच्या त्रासामुळेच हा प्रकार

लोणीकंद : कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केली असून पोलिसांच्या त्रासामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने मंगळवारी रात्रीपासून गावात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: चौकशीचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज दुपारी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोलवडी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. लोणीकंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोलवडी (ता. हवेली) येथे वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण करण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ३ आठवड्यांनी त्यातील एकाने रानमळ्यातील विहिरीत परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. या आत्महत्येला संबंधित पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद ही करण्यात आली आहे. २४ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल एम. एल. अवघडे हे नवनाथ गायकवाड या व्यक्तीच्या नावाने कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी कोलवडी येथे गायकवाडवस्तीवर गेले होते. या वेळी महेश अर्जुन पवार, परमेश्वर बबन गायकवाड व त्याचा मुलगा सतेज असे तिघे भेटले. या वेळी चौकशीदरम्यान गैरसमजातून बाचाबाची, भांडणे झाली. या तिघांनीही मारहाण केल्याचा आरोप करून अवघडे यांनी या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणला व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्या सुनेने कॉन्स्टेबल एम. एल. वारघडे यांच्याविरोधात शिवीगाळ व विनयभंगाचा तक्रार अर्ज दिला होता.दरम्यान, दोन्ही घटनांची चौकशी व कार्यवाही बाकी असताना सोमवारी परमेश्वर बबन गायकवाड घरातून निघून गेले. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास त्यांचा मृतदेह रानमळ्याच्या विहिरीत आढळून आला. याबाबत बाळासाहेब मुरलीधर गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत अंत्यविधीच न करण्याची भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ़ जय जाधव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना घटनास्थळी पाठविले़ त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली़ यावेळी नागरिकांनी लोणीकंद पोलिसांविषयी अनेक तक्रारी केल्या़ पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही़ तक्रार करणाऱ्यांनाच त्रास दिला जातो, असे सांगितले़ चिखले यांनी डॉ़ जाधव यांच्याशी ग्रामस्थांशी संपर्क करुन दिला़ डॉ़ जाधव यांनी चौकशी करु असे आश्वासन दिल्यानंतर गायकवाड यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ (वार्ताहर)