Pune: भरधाव दुचाकी घसरुन महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी तरुण वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:10 IST2025-06-04T16:09:14+5:302025-06-04T16:10:07+5:30

विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली, या अपघातामध्ये दोघे जखमी झाले, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला

College youth dies after falling off speeding bike fellow passenger survives accident in pune | Pune: भरधाव दुचाकी घसरुन महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी तरुण वाचला

Pune: भरधाव दुचाकी घसरुन महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी तरुण वाचला

पुणे : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तन्मय सचिन कळंत्रे (वय २१, रा. कोथरूड) असे मृत्यु झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर सेतुू सुरेंद्र सुरकार (वय २०) असे अपघातामध्ये जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तन्मय आणि सेतू हे शिवाजीनगर भागातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होते. ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाला. याबाबत सहायक फौजदार विजय डेंगळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

Web Title: College youth dies after falling off speeding bike fellow passenger survives accident in pune