शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:46 IST

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो.

पुणे : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे याबाबत चर्चा करणे आता योग्य नाही असेही ते म्हणाले.पुण्यात महसूल शेती विकास महामंडळ नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग व जमाबंदी आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता याबाबत चर्चा करणे गरजेचे नाही. संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही संस्थांचा योग्य तपास झाल्यानंतर राज्य सरकारला वाटले तर धनंजय मुंडे यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांच्याबाबत चर्चा करणे योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीची बदनामी केली जाऊ नये. कोणालाही दोष देऊ नये. मात्र, ज्या दिवशी दोषी आढळतील, त्या दिवशी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे.गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जे काही लागते, ते सरकार करत आहे. गृहखाते प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे काम करत आहे. कुठल्याही व्यक्तीला वाचविण्याचे काम केले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार हे द्वेषापोटी आणि आकसापोटी कोणावरही कारवाई करणार नाही. विरोधी पक्ष असो अथवा कुठलाही पक्ष असो, नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. योग्य दिशेने तपास सुरू असून सरकार योग्य दिशेने काम करत आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने या प्रकरणात मुंडे यांचे नाव आले असल्याचे सांगितले नाही. त्यांच्या मोबाइलमध्ये या संदर्भात काही आढळून आले आहे का, नेमका कुठे दोष आहे, हे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अनेक विषय राजकारणाच्या पलीकडचेवाल्मीक कराड यांचे मुंडे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यावरून टीका होत आहे. त्याबाबत बावनकुळे म्हणाले, कोणी कोणाचा मित्र असू शकतो. चांगल्या काळात काम केले तर त्याच्या सोबत राहतो. त्यानंतर बिघडला असेल किंवा गुन्हा केला असेल तर त्याच्या सोबत संबंध असेल तर ही गोष्ट वेगळी. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची सातत्याने भेट घेत आहेत. यावर ते म्हणाले, एखाद्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर राजकारणाशी याचा संबंध नाही. अनेक विषय हे राजकारणाच्या पलीकडचे असतात. आदित्य ठाकरे एखाद्या चांगल्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर यात गैर नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाAjit Pawarअजित पवार