शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:55 IST

"जनगणना २०२७ साठी  मंत्रिमंडळाने ११,७१८ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. ही भारतातील पहिलीच डिजिटल जनगणना असणार आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. यांत, जनगणना २०२७, कोळसा उत्पादन आणि शेतकऱ्यांशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे. यासंदर्भात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, जनगणना २०२७ साठी  मंत्रिमंडळाने ११,७१८ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. ही भारतातील पहिलीच डिजिटल जनगणना असणार आहे. डिजिटल डेटा सुरक्षितता लक्षात घेऊन ही जनगणना दोन टप्प्यांत केली जाईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान हाऊस लिस्टिंग आणि गृहनिर्माण गणनेचा असेल, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्या गणनेचा असेल. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे माहिती संकलित केली जाईल. 

जात सांगणे बंधनकारक नाही -  
वैष्णव पुढे म्हणाले, "यासंदर्भातील गॅझेट नोटिफिकेशन जारी होईल, त्यात जातीसंदर्भात माहिती देण्याची व्यवस्था असेल, मात्र जात सांगणे बंधनकारक नसेल. केवळ एकत्रित डेटाच (Aggregated Data) प्रकाशित केला जाईल. मायक्रो डेटा पब्लिश केला जाणार नाही."

'कोल सेतू' योजनेच्या माध्यमातून कोळसा उत्पादनात मोठ्या सुधारणा -
दुसरा मोठा निर्णय कोळसा उत्पादनाशी संबंधित आहे. यासंदर्भात बोलताना वैष्णव म्हणाले, 'कोल सेतू' योजनेच्या माध्यमातून कोळसा उत्पादनात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे भारत कोळसा उत्पादनात आत्मनिर्भर होत आहे आणि आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात येत आहे. आयात कमी झाल्याने देशाचे सुमारे ६० हजार कोटी रुपये वाचत आहेत. २०२४-२५ मध्ये १ अब्ज टन कोळसा उत्पादन झाले असून, देशातील वीज प्रकल्पांमध्ये विक्रमी कोळसा साठा तयार झाला आहे.

तिसरा निर्णय शेतकऱ्यांशी संबंधित -
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील तिसरा निर्णय शेतकऱ्यांशी संबंधित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२६ साठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मंजुरी दिली आहे. यानुसार, दळण्यासाठीच्या अथवा कीस करण्यासाठीच्या खोबऱ्याला १२,०२७ रुपये प्रति क्विंटल, तर गोल खोबऱ्याला १२,५०० रुपये प्रति क्विंटल, एमएसपी असेल. या व्यवहारांसाठी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या नोडल एजन्सी म्हणून काम करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi Government Approves Census 2027, Coal Production, and Farmer Support.

Web Summary : The Union Cabinet approved Census 2027 with ₹11,718 crore budget, focusing on digital data collection. 'Coal Setu' improves coal production, saving ₹60,000 crore in imports. Copra MSP for farmers approved for 2026.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाFarmerशेतकरी