दहशत पसरविणाऱ्याला कोठडी

By Admin | Updated: July 9, 2015 03:03 IST2015-07-09T03:03:14+5:302015-07-09T03:03:14+5:30

तलवारीच्या जोरावर भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न येरवडा परिसरात झाला.

The closet that spreads the panic | दहशत पसरविणाऱ्याला कोठडी

दहशत पसरविणाऱ्याला कोठडी

पुणे : तलवारीच्या जोरावर भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न येरवडा परिसरात झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
किशोर ऊर्फ लाल्या अरुण वाघमारे (वय ३०, रा. भीमज्योत मित्र मंडळाजवळ, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नामदार प्रदीप विठ्ठल शेलार यांनी फिर्याद दिली. ही घटना लक्ष्मीनगर येथील क्षीरसागर हॉल चौक परिसरात मंगळवारी घडली. आरोपी तलवार घेऊन परिसरात फिरत होता व त्याने दोन भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा सराईत गुंड आहे.
येरवडा परिसरातील मजूर व किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न तो करीत असतो. तो गुंडप्रवृत्तीचा असल्याने तक्रार देण्यास कोणी धजावत
नाही.
शस्त्रास्त्रांच्या जोरावर त्याने काही पैसे उकळले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याचा सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
(प्रतिनिधी)

Web Title: The closet that spreads the panic